मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

बीडच्या जाळपोळीच्या घटनेचा मास्टरमाईंड कोण?

बीडच्या जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत 120 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे या तपासामध्ये पाच अल्पवयीन मुलांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मराठा आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या बीडमधील जाळपोळी आणि दगडफेकीमध्ये आमदारांच्या घरावर लक्ष करण्यात आलं, मात्र यामागे एक षडयंत्र असून या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण हे तपासा अशी मागणी ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.

हातामध्ये दगड, काट्या आणि ज्वलनशील पदार्थ घरावर पेटवून दंगा करणारे हे तरुण 25 वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे यातील बरेच तरुण हे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात आहेत. बीड शहरातील जाळपोळ प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या हाती पाच अल्पवयीन तरुण सुद्धा लागलेत. हे पाच अल्पवयीन याच जमावामध्ये सहभागी झाले होते. 120 तरुणांमध्ये बहुतांश तरुण 25 ते 30 वयोगटातील आहेत.

आपल्यावर हल्ला करण्याचा उद्देश, प्रकाश सोळंखेंचा आरोप
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवली. यामध्ये इतर समाजाचे लोक देखील असल्याचं त्यांनी सांगितलं असून यामध्ये अवैध धंदे आणि राजकीय विरोधक कट रचून माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला असल्याचं प्रकाश सोळंके यांनी आरोप केला. तर यामध्ये काही शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सदस्य देखील असल्याचा दावा सोळंके यांनी केला आहे. काही हल्लेखोरांकडे धारदार शस्त्र देखील होती, त्यामुळे ते माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले असावे असे देखील सोळके म्हणाले होते.

जमावाचा उद्देश जीवाताला धोका पोहोचवण्याचा, जयदत्त क्षीरसागरांचा आरोप
बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी देखील मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आणि यावर जयदत्त क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अतिरेक्यांनाही लाजवणारा हा प्रकार असल्याचे सांगत ब्रिटिश आणि निजामाच्या काळात देखील अशा घटना घडल्या नाहीत. त्यामुळे या घटनेमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांनी लावावा. त्याचबरोबर जमावाचा उद्देश फक्त जाळपोळ करण्याचा होता की कोणाच्या जीविताला धोका पोहोचवण्याचा होता असा देखील प्रश्न जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

माजलगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके आणि बीड चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर या दोन आमदाराच्या घरावर जाळपोळ केल्यानंतर आता यामागे राजकीय विरोधक असल्याचा गंभीर आरोप या नेत्यांनी केला आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांमध्ये आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले असले तरी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अथवा नेते यात सहभागी असल्याचे पाहायला मिळत नाही. मग पोलीस या जाळपोळीच्या घटनांच्या मुळाशी कधी जाणार हाच खरा सवाल आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!