महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

विधानसभा अध्यक्षांनाच आयसीयू मध्ये ठेवण्याची गरज -संजय राऊत.

 सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत होणाऱ्या दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीकास्त्र सोडले आहे.

“विधानसभेचे अध्यक्ष हे खडे बोल सुनावण्याच्या योग्यतेचे आहेत. सरकार जाण्याची वेळ आता आली आहे. जितका वेळ आयसीयू (ICU)मध्ये ठेऊन सरकार वाचवायचे होते ते अध्यक्षांनी वाचवले आहे. आता अध्यक्षांनाच ICU मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत राऊतांनी नार्वेकरांवर टीका केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!