संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – १८
संत रविदास जयंती निमित्त पुष्प 18 वे
तेरा जन काहे को बोलै!
बोली बोली अपनी भगति को खोलै!! बोलत बोतल बढै वियाधी, बोल अबोलै जाई!
बोलौ बोल अबोल कोप करे ,बोल बोल को खाई!!
बोलै ज्ञान मान परि बोलै,बोलै बेद बडाई!
उर मै धरि जब ही बोलै ,तबही मुळ गवाई!!
बोलि बोलि औरहि समजावै ,तब लटि समझन भाई !
बोलि बोलि समझी जब बुझी ,
काल सहित सब खाई!!
बोले गुरू अरू बोलै चैला,बोल बोल की परतिति आई!
कह रैदास मगन भयो जबही ,तबही परमनिधि पाई!!…
संत रविदास ह्या पदावलीत तथाकथित बोलब्च्चनला कसे उघडे पाडतात हे वाचण्यासारखे आहे…
जो तूझा जो खरा भक्त आहे तो बडबड का करेल?करणारच नाही..! कारण , ढोंगी विदुषक,अर्ध्या हळकुंटाने पिवळे झालेले वाचाळवीर अलंकारीक, चटपटीत, मधाळ ,फसव्या बोलात आपण किती हुशार आहोत, निष्ठावंत आहोत,एवंम किती महान भक्त व वेदज्ञानी आहोत हे नाचत,वाजवत नकला करत सदा बोलत असतात. पोपटपंची बोलून बोलून वैचारीक व्याधीचे (व्हायरस संसर्ग) वाढवून बोलाला बोलूनच अबोल करत असतात.त्यामुळे त्यांच्या अश्या बाष्पमय बडबडण्याने मूळ स्थिती बाजूला पडते.परिणामी सुज्ञ क्रोधीत होतात.आणि खोटे बोलून रेटून बोलण्याने बोल वाढतात आणि मूळ बोल झाकून रहातात .! बरं…, बोलून बोलून तमचे बोल समोरच्याला कळतीलच असे ही नाही.आणि अश्या बोलण्याने फुकट वेळ निघून जातो.धड नीट काही बोलले जात नाही.ना नीट सांगितलेले कळत नाही.नुसतीच वटवट..! किटकिट …!अश्या परिस्थितीतआपण काय करावे?.. तेंव्हा गुरू रविदास म्हणतात,… तुझ्यावर (सत्यावर) ज्यांचा पुर्ण विश्वास आहे. तो कश्याला वायफळ बडबडेल.जेंव्हा गुरू व शिष्य दोघेजण बोलतात म्हणजे संवाद करतात तेंव्हा खरया ज्ञानाची प्रचिती येते. आणि सत्य गवसते. बोलणारा ज्ञानी असतोच असे नाही.आणि मुका अज्ञाणी असतो असे ही नाही.आपण स्थिरचित्त व एकमार्गी राहिलो की परमपद प्राप्त होते .
जय रविदास
लेखक ,ॲड.आनंद गवळी.
राष्ट्रीयउपाध्यक्ष* ,
राष्ट्रीयचर्मकारमहासंघ*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत