मराठवाडामहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

नळदुर्ग शहरात महाराजस्व भटके विमुक्त जाती व जमाती विकास परिषदेचे आयोजन

नळदुर्ग शहरातल्या अनेक लाभार्थ्यांनी घेतला शिबीराचा लाभ

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

भटके विमुक्त विकास परिषद
महाराजस्व अभियाना अंतर्गत राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्त जाती आणि जमाती व आदिवाशी व्यक्तीना शासकीय प्रमाणपत्र प्रदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .
या शिबीरात जन्म मृत्यू नोंद , जात प्रमाणपत्र , शिधा पत्रिका ,
श्रावणबाळ , निराधार योजना व शासकीय योजने अंतर्गत सर्व कामे व महसुल विभागा मार्फत तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे दिसून आले .भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजना मिळाव्या योजनांमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे व त्यांचे हक्काची योजना मिळवून ते स्वयं रोजगार उपलब्ध करून घ्यावी भटक्या जमातीसाठी खूप मोठे योजना असून या शासकीय योजना या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे हे विविध योजने पासून वंचित असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नळदुर्ग शहरांमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत राजे उमाजी नाईक भटके विमुक्त व जाती जमातीसाठी व आदिवाशी नागरीकांसाठी भटक्या विमुक्त विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाच्या धाराशिव जिल्हाप्रमुख संगीता पाचंगे व मीरा मोटे यांनी या कार्यक्रम ठिक ठीकाणी आयोजित केला जात आहे .
कार्यक्रमाचे उद्घाटन नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक संजय बताले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजहर जागीरदार , नळदुर्ग विभागाचे मंडळ अधिकारी जयंत गायकवाड , स्थानिक तलाठी वायचाळ पुरवठा विभागाचे पेशकर बालाजी चामे , सं गो यो चे राहुल वाघमारे ई सेवा केंद्राचे महेश व्हटकर आधार कार्ड काढण्यासाठी आकाश माळकुंजे नगर नगर परिषदेचे अजय काकडे कार्यालयीन अधीक्षक दीपक कांबळे भाजपाचे श्रमिक पोतदार आधी जणांच्या उपस्थितीमध्ये या लाभार्थ्यांसाठी शासकीय योजनेचा लाभ व्हावा म्हणून नळदुर्ग येथे एक दिवसाचे भटक्या विमुक्त जमातीचे विकास शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात अनेक भटके विमुक्त जाती जमातीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व अनेकांची विविध योजना अंतर्गत नावे नोंदवली असून त्यांचे काम तात्काळ करून देण्यात येणार असल्याचे समजले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियान जिल्हा प्रमुख संगीता पाचंगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार मीरा मोटे यांनी मानले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!