बिग बी ठणठणीत; ऑपरेशन ची बातमी ठरली अफवा ?
बॉलिवुडचे शंहशाह अमिताभ बच्चन यांच्या अँजियोप्लास्टीच्या बातम्यांना ‘फेक न्यूज’ सांगण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी देखील खोटी आहे.
15 मार्च रोजी अमिताभ बच्चन यांच्या पायात रक्ताच्या गुठल्या जमा झाल्या असून आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे अँजियोप्लास्टीकरिता अमिताभ बच्चन यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर सोशल मीडियावर चाहते बिग बी यांच्यासाठी चिंता व्यक्त करु लागले.
अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आल्यानंतर काही तासात संध्याकाळी अमिताभ बच्चन एका कार्यक्रमात दिसले. बिग बी ठाण्याच्या दादोजी कोंडादेव स्टेडियमवर इंडियन स्ट्रीट प्रीमियलर लीग (ISPL) च्या फायनल सामन्या दरम्यान दिसले. माझी मुंबई विरुद्ध टायगर्स ऑफ कोलकाता असा सामना होता. यावेळी अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन दोघेही उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत