केंद्राची कर्मचाऱ्यांना होळी निमित्त मोठी आर्थिक भेट.. मूळ वेतनात वाढ

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील सर्वात मोठी सरकारी आयुर्विमा कंपनी, लाइफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एलआयसी) लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने मूळ वेतनात १७% वाढ करण्यास मंजुरी दिली असून सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा सुमारे एक लाख कर्मचारी आणि सुमारे ३०,०० पेन्शनधारकांना होणार आहे. अशा स्थितीत, यंदाच्या पगार वाढीसोबतच एलआयसी कर्मचाऱ्यांना दोन वर्षांच्या पगाराची थकबाकीही मिळणार आहे.
अलीकडसह केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) ४ टक्क्यांपर्यंत वाढ केली, त्यामुळे आता महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या टेक-होम सॅलरी पॅकेजमध्ये वाढ होण्याची खात्री आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या श्रेणी म्हणजेच X, Y आणि Z होय. जर X श्रेणीचा कर्मचारी शहरे/नगरांमध्ये राहत असेल, तर त्यांचा HRA (घरभाडे भत्ता) ३०% पर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे Y श्रेणीसाठी HRA दर २०% आणि Z श्रेणीसाठी १०% असेल. सध्या, शहरे/नगरे X, Y आणि Z मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे २७, १८ आणि ९% घरभाडे भत्ता मिळतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत