संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला -१६

संत रविदास जयंती निमित्त..पुष्प 16
ज्यांहा देखो वांहा चामही चाम!
चामके मंदीर बोलत राम!!
चाम कि गऊ चामका बचडा!
चाम ही घुने चाम ही ठाडा!!
चाम का हाती चाम का राजा !
चामके ऊटपर चामका बाजा!!
कहत रोहिदास सुनो कबीर भाई!
चाम बिना देह किनकी बनाई!!
सुप्रसिद्ध मराठी संत सेना,संत कबीर हे संत रविदासजींच्या सम कालीन संत होते. संत कबीरजी तर्क शुद्ध युक्तिवाद करण्यात पारंगत होते.कबीरजी मूर्तिपूजक नव्हते. रोहिदास सगुण ब्रम्हाचे तत्त्व लोंकाना समजावून सांगत तर कबीरजी लोकांना निर्गुण तत्त्व सांगत.एकदा..संत कबीर रविदासाना पारखण्यासाठी त्यांच्या कुटीमध्ये आले.कबीराना तिथे जिकडे तिकडे चामड्याचा पसाराच पसारा दिसला.त्यात आरी, रापी, फरांडी आणि ती सुप्रसिद्ध कटौती या पसार्यात त्याना विष्णूची मुर्ती एका कोपर्यात दिसली. गळ्यात माळा कपाळावर टिळा आणि कामात मग्न असलेले रविदासजीला पाहून कबीर म्हणाले…
संगून भगत करे रोहिदासा !
वैष्णव आप कव्हावे !!
माला टिलक मुद्रा छापे,कबिरा सुनके आवे!!
सुन सुन साधु जी राजाराम कहो जी !!
त्याना त्या कुटीत कुठे भक्ती भाव दिसेना. असल्या खेटरयात देव कसा असेल आणि रोहिदास कशी भक्ती करेल? आपल्या बरोबरील भक्तांना ते म्हणाले…या दोन संतामध्ये तिथेच वाद विवाद सुरू झाला उत्सुकतने आजू बाजूचे लोक जमले. दोन ज्ञानी संत एकत्र येऊन त्यांचे ब्रम्हवादावर वाद चालू झाला आहे म्हंटल्यावर त्या दुर्लभ क्षणांचा लाभ घेण्यासाठी तिथे गर्दी उसळली.त्याचे वर्णन “कबीर रोहिदास संवाद” ह्या हिंदी काव्यात लिहलेले अभ्यासकांना वाचण्यास मिळते.वरील पदावलीत रविदासजी कबीरजीना कसे निरुत्तर करतात वाचण्यासारखे आहे.. पृथ्वीवर जेवढे सजीव आहेत ते निर्गुणाचे स्वरूप आहेत.ज्या चामड्याला गलिच्छ समजले जाते .त्या चामड्याचे काम करतो म्हणून विटाळ होतो असे समजले जाते.ही शिवता शिवत कल्पनाच चुकीची आहे .बघा…, रोहिदास सांगतात ..इथंच काय जगात जिकडे बघाल तिकडे चमडेच चमडे दिसते.काळे ,गोरे, स्त्रि, पुरूष, उंच, बुटके, म्हातारे, तरूण साऱ्याची शरीरे चमड्यांची आहेत. शरीरं हे सजीवांची मंदीरं आहेत.त्या चामड्यांच्या मंदीरात आपला प्राण म्हणजेच राम रहातो. तो रामच सजीवाच्या चामडी मुखातून बोलतो. बघा त्या गाई चामड्याच्याच, तिचे वासरू चामड्याचेच…त्या चमड्याला किती ही कुटा त्या पासून ककोणत्याही वस्तू बनवा त्या चमड्याच्याच..!. हत्तीच्या रत्नजडित अंबारीत बसलेला तुमचा राजा चामड्याचा तो हत्ती चामड्याचा ..! पुढे डौलाने चाललेला उंट चामड्याचा..! त्याच्या पाठीवर वाजणारा नगारा ही चामड्याचाच . कबीर भाई ऐका …जगात चमड्या शिवाय कोणीच नाही. निर्गुणलाच सगुणात चमड्याने लपेटले आहे.निर्गुणआणि सगुण एकच आहे.कबीरा तुला आत्मज्ञान नाही. ज्यात जीव आहे त्याला त्वचा आहे.ह्या त्वचेला अमंगल अशुभ अपवित्र समजू नकोस.हत्तीचे बळ आणि राजाची सत्ता जरी असली तरी ती चमड्यातच आहे…पण ते टिकणारी नाही.टिकणार आहे तो आतला आत्माराम..!
गोरे रंग पे न इतना गुमान कर ,
गोरा रंग दो दिन मे ढल जायेगा!!
जय रविदास
लेखक अँड. आनंद गवळी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत