अखेर जी.एन.साईबाबा आणि सहकाऱ्यांना न्याय. कोणतेही पुरावे नसताना इतका काळ अटक केल्या बद्दल न्यायालयाचे कडक शब्दात ताशेरे.
नक्षलवाद्यांशी कथित संबंधांच्या आरोपांखाली अटक झालेले प्राध्यापक जी.एन.साईबाबा आणि इतर पाच जणांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं निर्दोष मुक्तता केली.
न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एसए मेनेजेस यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. हे सर्वजण दोषी आहेत, हे सिद्ध करणारे पुरावे फिर्यादी पक्षाला सादर करता न आल्यानं या सर्वांची मुक्तता करत असल्याचं निकालात नमूद केलं आहे.
याचवेळी न्यायालयानं फिर्यादी पक्षाला खडे बोलही सुनावले. साईबाबा यांच्यासह हेम मिश्रा, महेश तिर्की, विजय तिर्की, नारायण सांगलीकर, प्रशांत राही आणि मृत झालेले पांडु नरोटे या सर्वांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं रद्द करत त्यांची निर्दोष मुक्तता केली.
न्यायालयानं हा निर्णय दिल्यानंतर फिर्यादी पक्षानं या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सहा आठवडे स्थगिती देण्याची विनंती केली. त्यावर याबाबत लेखी अर्ज सादर करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत