ईव्हीएम मशीन लोकशाही साठी घातक – जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांचा “ईंडीया अगेंस्ट ईव्हीएम” च्या आंदोलनाला जाहीर पाठींबा.


नागपूर (प्रतिनिधी) दि. ईव्हीएम मशीन बद्दल वर्ष२०१४साली एक मोठे अधिकारी आले होते। त्यांनी मला ईव्हीएम मशीन मध्दे मोठा घोळ असुन तुम्ही हा मुद्दा हातात घ्या, अशी विनंती केली होती। त्यावेळी त्यांनी ईव्हीएम मध्दे कशी धांधली होते. हे सांगीतले होते. निवडणुक हि आता राजनेता आणि कार्पोरेट च्या अवतीभवती फिरत आहे. त्यामुळे निष्पक्ष निवडणुक हा एक मोठा प्रश्न आहे. “ईंडीया अगेंस्ट ईव्हीएम” च्या धरणे आंदोलनाला संबोधित करतांना जेष्ट समाजसेविका मेधा पाटकर यांनी आपले विचार मांडले, कायद्याने वागा चळवळीचे राज असोरोनडकर यानीही विचार व्यक्त केले.
दिनांक १/३/२०२४पासुन नागपुरच्या संविधान चौक येथे इंडिया अगेंस्ट ईवीएम फोरम तर्फे बेमुदत धरने आंदोलन सुरु आहे. सदर आंदोलनाला मोठ्या प्रमाणात नागपुर आणी विदर्भातील नागरीकांचा आणि संघटनाचा सहभाग लाभत आहे. फोरमच्या वतीने संविधानाच्या कक्षेत राहून आंदोलनात्मक आणी न्यायीक लढाई लढली जात आहे.
धरणे आंदोलनात विशेष करुन ईंडीया अगेस्ट ईव्हीएम च्या अँड स्मिता कांबळे, निमंत्रक प्रीतम बुलकुंडे, संयोजक अँड मोहम्मद अतीक आणी प्रवक्ता विश्वास पाटील, राज सुखदेवे, आनंद तेलंग, राजीव झोडापे, राजेश लांजेवार, अँड अंझार मीर्झा, राज सुखदेवे, राजु झोडापे, अँड भावना जेठे, हरीष लांजेवार, भारत लोखंडे, धनराज गजभिये, सरोज आगलावे, अँड मोसमी बागडे, राजश्री ढवले, अरुण पिल्लेवान, यशवंत भारशंखर, आनंद तेलंग, अजय बागडे, जयश्रीगनवीर, ज्योती नाईक, मयुरी धूपे, आदिती पाटिल, काशीश जिवने, मोना तायडे, रितेश देशभ्रतार, अपर्णा चवरे, प्रशांत शेंडे, अँड संतोष चव्हाण, अँड विनोद खोबरे दिशा वानखेडे, सरोज डांगे आणि प्रामुख्याने महिला वर्ग उपस्थित होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत