नोकरभरतीचा लाभ मराठा समाजालाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकाभिमुख असलेल्या महायुती सरकारने आतापर्यंत ७५ हजार युवकांना नोकरी दिली आहे. भविष्यात एक लाख ६० हजार युवकांना नोकरी दिली जाणार असून, नोकरभरतीचा लाभ आता मराठा समाजालाही होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी बारामतीमध्ये दिली. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानाच्या कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या नमो महारोजगार मेळावाच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.बारामती येथील विद्या प्रतिष्ठानाच्या कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या नमो महारोजगार मेळावाच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, सुनेत्रा पवार आणि आमदार दत्तात्रय भरणे या वेळी उपस्थित होते. बारामती पोलीस उपमुख्यालय आणि पोलिसांचे निवासस्थान या इमारतींचे व बारामती एसटी बसस्थानकाचे उद्घाटनही शिंदे यांच्या हस्ते झाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत