मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

तुळजापूर चे सुपुत्र आयु. संजय आबाराव कदम यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिमाखात संपन्न..

दैनिक जागृत भारत च्या टीम तर्फे सेवानिवृत्तीच्या मंगल कामना..

धाराशिव प्रतिनिधी : दिनांक २९.२.२०२४ रोजी रा. प. महामंडळ कार्यालय धाराशिव येथे आस्थापना विभागात वर्ग २ पदावरून आयु. संजय आबाराव कदम यांनी सेवाकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. विभाग नियंत्रक आयु. चेतना खिरवाडकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुख, रा. प. महामंडळातील सन्माननीय पदाधिकारी, विविध कर्मचारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, मित्र मंडळ व नातेवाईकांनी एकत्रित येऊन दिमाखदार कार्यक्रम संपन्न केला.

विविध क्षेत्रातील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी, नातेवाईक यांनी अगदी आदराने प्रेमाने आयु. संजय कदम व त्यांच्या सुविद्य पत्नीचा सत्कार करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. भारतीय बौद्ध महासभा, आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर धम्मरत्न देविदासराव कदम सोशल फाउंडेशन तुळजापूर व दैनिक जागृत भारत च्या टीम तर्फे सेवानिवृत्तीच्या अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये आयु. संजय कदम यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. अत्यंत प्रामाणिक, शिस्तप्रिय, हसतमुख व सर्वांशी जुळवून घेत कायम कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी काम केल्याचे नमूद केले. आस्थापनेत काम करताना अनेकदा मतभेद होतात पण कधीही कोणाशी मनभेद होऊ दिला नाही हे आवर्जून सांगितले.

आपल्या मनोगतात आयु. संजय कदम म्हणाले की बरेच कठीण प्रसंग येऊन गेले पण सहकाऱ्यांनी, परिवाराने भक्कम साथ दिल्यामुळे उत्तम कर्तव्य बजावू शकलो. विशेषतः पत्नी आणि सर्व बहिणींचे मनस्वी आभार मानले. निवृत्त होताना मी पूर्णपणे समाधानी आहे की प्रामाणिक काम करू शकलो, जबाबदारीला उचित न्याय देऊ शकलो व सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यात कमी पडलो नाही.

निवृत्ती नंतरचा वेळ कुटुंब मित्र परिवार नातेवाईकांना व स्वतःचे छंद जोपासण्यासाठी द्यावा अशी उपस्थित सर्वांनी त्यांना आग्रहाची विनंती केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!