धम्मरत्न देविदासराव कदम सोशल फाउंडेशन तुळजापूर या संस्थेच्या वतीने “बहुजन मुला मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी” या विषयावर आयु. किशोर भगत यांचे मार्गदर्शन.

तुळजापूर प्रतिनिधी : बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे “बहुजनांच्या मुला मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी” हा मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख मार्गदर्शक सावित्रीमाई फाउंडेशन पुणे येथील आयु. किशोर भगत हे होते. किशोर भगत सर हे “लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स” या ठिकाणी प्रवेश मिळवलेले संशोधक अभ्यासक आहेत.
गाव खेड्यातील लोकांना उच्च शिक्षणाच्या, विदेशी भाषा शिकून त्या आधारे उत्पन्नाच्या संधीबाबत खूप कमी माहिती आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध अभ्यासक्रम व शिष्यवृत्ती बद्दल म्हणावी तेवढी जनजागृती नाही. प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून प्रेरणा घेऊन आपण आयुष्यात खूप मोठे ध्येय ठेवायला हवे. पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांपेक्षा विदेशात शिक्षण घेण्यासाठी आपण प्रयत्न का करू नये, जपान हा बुद्धिस्ट देश आहे तर आपण त्यांची भाषा शिकून तेथे सहज प्रवेश मिळवू शकतो का ? या व इतर विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
लॉ, पत्रकारिता, राज्यशास्त्र इत्यादी विषय तसेच इंग्रजी भाषा, पर्सनल डेव्हलपमेंट अशा सॉफ्ट स्किल्स वरती आपण खूप कमी लक्ष केंद्रित करतो. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण या बाबतीत बाबासाहेबांचे अनुकरण केले पाहिजे. बाबासाहेब कायम सुटा बुटात राहिले, देशांतच नाही तर विदेशातील नामांकित विद्यापीठातील पदव्या मिळविल्या या गोष्टी आपण अंगिकारल्या पाहिजे असे त्यांनी पोटतिडकीने सांगितले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाळा कॉलेज चे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. भारतीय बौद्ध महासभेच्या राजश्रीताई कदम, सूकेशन ढेपे, दिशा समाज विकास संस्थेचे बाबासाहेब वढवे सर, आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर चे पदाधिकारी यांच्यासह आयु. प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, आयु, शेकु जेटीथोर सर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. देविदास विक्रांत कदम यांनी तर आभार प्रदर्शन आयु. निशा वडवे या विद्यार्थिनीने केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत