देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

देश वाचवायची फक्त एकच संधी ..!!

विश्वास ठेवा अगर ठेवू नका; पण हा देश तुमच्या हातातून गेल्यासारखा आहे. आता शेवटची फक्त एक संधी २०२४ ला मिळणार आहे. त्या आधी उत्तर प्रदेश मधील जनतेला मुळावर घाव घालण्याची ऐतिहासिक संधी आहे. तुम्हाला खरंच आपला देश वाचवायचा असेल, तर एवढं करा. हा देश ज्यांच्या हातात आहे; त्यांनी पूर्ण बरबाद केला आहे. १०० वर्षा पूर्वी तुमचे पूर्वज कसे होते; ते आपल्या आजी, आजोबा किंवा आई वडिलांना विचारा. त्या ही पेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होत आहे.

● ही समस्या दोन/चार विकृत लोकामुळे निर्माण झाली, असं नव्हे. अख्खा लांडग्यांचा कळप गावातून हाकलून द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. या बाबतीत स्वतःही कन्फ्युज होऊ नका. इतरांना करू देवू नका.
● तुम्ही एकटे आहात, हे मनातून काढून टाका.
● देश चुकीच्या हातात गेला आहे, हे खरं असलं तरी, ‘चुकीला पराभूत करणं अशक्य आहे’ या न्यूनगंडातून बाहेर या.
● ‘लोक समोर येत नाहीत, लोक घाबरतात, लोक ‘त्यांच्या’च बाजूला आहेत;’ हे रडगाणं बंद करा.
● मी सामान्य माणूस आहे, मी काय करू शकतो ? माझ्या हातात काय आहे ? हे पालुपद बंद करा. देशात लोकशाही आहे आणि एक व्यक्ती एक मत, ह्या सूत्रात प्रचंड मोठं सामर्थ्य आहे, याची जाणीव ठेवा. हे सर्वात आधी तुमच्या जवळच्या लोकांना पटवून द्या. घरच्या लोकांना पटवून द्या.
● तुम्ही त्रस्त आहात, तसेच शेकडो, हजारो, लाखो, करोडो लोकही परेशान, अस्वस्थ आहेत, याची खात्री बाळगा.
● ‘मी यांच्याशी लढणार आहे. मी बिकाऊ पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही’ असा निर्धार करा. तशी शपथ घ्या. मित्रांना, नातेवाईकांना, समाजाला हे ठासून सांगा. पुन्हा पुन्हा सांगत रहा. त्यांनाही तसे करायची विनंती करा.
● सैतानाच्या कळपात काही लोक स्वार्थापोटी तर काही भीतीपोटी सामील झालेले आहेत. काही लोकांना त्यांची घोडचूक लक्षात येत आहे. अशा लोकांशी जरा सबुरीने वागा. त्यांना हिडीस फिडीस करू नका. चुका प्रत्येकाच्याच होत असतात. (मात्र कितीही मोठे असले तरी तुम्ही त्यांच्या आहारी जाऊ नका. पुन्हा त्यांच्या नादी लागू नका. त्यांच्यापासून सतत सावध रहा.) मात्र जे अगदीच मूर्ख आहेत, अंधभक्त आहेत, त्यांच्याशी ताबडतोब संबंध तोडा. उगाच वाईट वाटू नये म्हणून गोड गोड बोलू नका किंवा वादही घालू नका. प्रश्न देशाच्या अस्तित्वाचा, सामाजिक समतेचा, बंधुभावाचा आहे, हे ध्यानात ठेवा. अशा अंधभक्तांना आपल्या फ्रेंडलिस्ट मधून ताबडतोब कमी करा.
● जो देशाचा विचार करू शकत नाही, जो स्वार्थासाठी देशाशी गद्दारी करतो, तो तुमचाही होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या.
● ‘पर्याय कोण’ असले बालिश प्रश्न विचारू नका. विकृतीला समूळ नष्ट करायची असते. तिला पर्याय शोधायचा नसतो. आणि परिस्थितीनुरुप योग्य पर्याय आपोआप समोर येत असतो. चिंता करू नका.
● हे करत असताना कोणत्याही विशिष्ट जाती समूहाला सरसकट टार्गेट करू नका. इतरांनाही तसे करू देवू नका. स्वार्थी, बदमाश लोक सर्वत्रच आहेत. ते आपल्याही जातीसमूहात आहेत, याचे भान ठेवा. दोषी लोकांचा विरोध करा. सरसकट समूहाचा नाही.
● एखादी व्यक्ती आपल्या जातीची आहे, नात्यातली आहे, आपल्या भाषेची, प्रदेशाची आहे, एवढ्या कारणासाठी त्याचे गुन्हे, अपराध पाठीशी घालू नका. त्यातूनच नवे भस्मासुर पैदा होतात, याचे भान ठेवा. अशांचा स्पष्ट विरोध करा.
● दलाल मीडियावरील बातम्या पाहणे बंद करा. अशा चॅनेलवर बहिष्कार टाका. सोशल मीडियाचा वापर करा. त्यांच्या बातम्या बघा. योग्य बातम्या देणारे YouTube चॅनल कोणते आहेत, त्याची माहिती एकमेकांना द्या. असे बरेच चॅनल्स आहेत. त्यांना सबस्क्राईब करा. शक्य तेवढे आर्थिक सहकार्य करा.
● घरात बसून किंवा फुकटात क्रांती होईल, ही मानसिकता आता सोडून द्या. देशासाठी, पुढील पिढ्यांसाठी त्याग करायला शिका.
● चुका इतरांच्या होतात, तशा आपल्याही होऊ शकतात. आत्मचिंतन करा. झालेल्या चुका मोकळेपणाने मान्य करा. त्या दुरुस्त करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
● एक दिवस सर्वांनाच मरायचे आहे. पण इतिहास मात्र लढणारांची अभिमानाने नोंद घेतो, याची जाणीव ठेवा. कुत्र्या-मांजरासारखी लाचारी पत्करून रोज रोज मरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगायला शिका.
● देश माणसांनी बनतो. माणसाची सेवा, त्याचे हित म्हणजेच राष्ट्रहित, तीच खरी देशभक्ती आहे. नदी, नाले, पहाड, जंगल, गाय, बैल ही देशाची संपत्ती आहे. या संपत्तीची काळजी जरूर घ्या. पण माणसांना उपाशी ठेवून जनावरांची, नदी – नाल्यांची पूजा करणे, हा शुद्ध मूर्खपणा आहे. त्यांची स्वच्छता वेगळी, काळजी घेणे वेगळे आणि पूजा करणे वेगळे, याचे भान असू द्या. असल्या कारस्थानात सहभागी होऊ नका.
ई वी एम बंद करा.
● गुड मॉर्निंग, गुड नाईट, वाढदिवस, पुण्यतिथी असले मेसेज पाठवण्यात स्वतःचा व इतरांचाही वेळ वाया दवडू नका. अगदीच जवळच्या व्यक्ती असतील तरच आणि आवश्यक असेल तिथेच असे मेसेज करा.
● हा मेसेज कमीतकमी २५ लोकांना पाठवा. पुन्हा पुन्हा पाठवत रहा. इतरांनाही पाठवायला सांगा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!