महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीयविचारपीठ
महाराष्ट्राचा मुड….!!
हातात सत्ता आहे आणि मिडिया बगलेत आहे म्हणून प्रसार माध्यमातुन ४००+ असा प्रचार करणा-या भाजपच्या संदर्भात महाराष्ट्राचा मुड कसा आहे ते समजून घेतले पाहिजे....!!
महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे कारण देशातील सर्वात जास्त खासदार निवडून देणा-या उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो...!!
२०२४ मध्ये आपणं महाराष्ट्रात निवडून येऊ शकत नाही हे वेगवेगळे सर्वे करुन समजल्यामुळे भाजप हा पक्ष मनातून प्रचंड घाबरलेला आहे, आणि त्यामुळे भाजप विरोधी पक्षांची फोडतोड करीत आहे. आणि आम्ही मजबूत आहोत असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे....!!
आतापर्यंत एकाही नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करुन मी भाजपची विचारधारा अंगिकारुन भाजप मध्ये प्रवेश करीत आहे असे जाहीर केले नाही, जे जे भाजप मध्ये गेले त्या सर्वांची "मजबुरी" आहे. अर्थात "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" असा हा प्रकार आहे...!!
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातील भाजपच्या सोबतं गेलेले सगळे महाभाग जेलवारी वाचविण्यासाठी तिकडे गेले आहेत हे आता लपून राहिले नाही. हिम्मत असेल तर भाजपने जाहीर करावे की, फुटीर शिवसेना,फुटीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये अमुक एक मंत्री,किंवा आमदार निष्कलंक आहे,त्याच्यावर कुठलाच आरोप वा चौकशी नाही.अशी ही वस्तुस्थिती असल्यामुळे त्यांच्या सोबतं मतदार गेला नाही भाजपच्या हातात भोपळाच लागेल हे कुण्याही ज्योतिषाला विचारायची गरज नाही...!!
१) स्व पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना तोंड वासुन वाट पाहत रहा म्हणायचं, सतरंज्या ऊचला म्हणून आदेश द्यायचे आणि इतर पक्षातून आलेल्यांना मंत्रीपद,तिकीट आणि सत्तेच्या खुर्च्या द्यायच्या या दिवाळखोर नीतीमुळे भाजप मधील निष्ठावंत कार्यकर्ते आणि मतदार भाजपला धडा शिकविण्याच्या मूडमध्ये आहेत....!!
२) ज्यांना ज्यांना धाक दाखवून बळजबरीने पक्षांतर करायला मजबूर केले ते सगळे संधीची वाट बघत आहेत आणि आपल्या मानेवरील टांगती तलवार हटविण्याचा विचार करीत आहेत म्हणून आयाराम, गयाराम भाजपचे नाही तर स्वहिताचे बघतील, भाजपला इंगा दाखविण्याच्या मुड मध्ये आहेत....!!
३) आरक्षण देतो म्हणून धनगर आणि मराठा समाजाला भावनिक दृष्ट्या झुलवत ठेवले, खोटे आश्वासने दिली आणि दहा वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असुनही भ्रमनिरास केला म्हणून उपोषण करणारे, मोर्चे काढणारे, धरणे आंदोलन करुन पायपीट करणारे,दमलेले आरक्षणवादी खोटारड्या, थापाड्या भाजपला धडा शिकविण्याच्या मूडमध्ये आहेत....!!
४) नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत परंतु महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरात राज्यात पळवून नेल्यामुळे महाराष्ट्रातील किमान चार ते पाच लाख बेरोजगार तरुणांच्या हातातोंडाशी आलेली रोजगाराची संधी हिसकावल्यामुळे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुण भाजपला हिसका दाखविण्याच्या मुड मध्ये आहे...!!
५) आम्ही संविधान बदलणार आहोत असे ऊघडं बोलून दाखवले जाते आहे.त्यामुळे अनु. जात आणि जमातीचा समुह खाडकन जागरूक झाला. त्याला कळून चुकले आहे की,संवैधानिक हक्क आणि अधिकारामुळे आम्हाला माणूस म्हणून मान्यता मिळाली अन्यथा आम्ही गावकुसाच्या बाहेर होतो. तसेच आमचे जगणे पशुतुल्य होते, पुन्हा आमची तीच गत होईल या भीतीपोटी भयग्रस्त झालेला एस. सी. एस. टी. २०% समुह भाजपला नेस्तनाबूत करण्याच्या मूडमध्ये आहे....!!
६) धार्मिक उन्मादात अल्पसंख्याक समुहाच्या जगण्याचा प्रश्न जटिल झाला आहे, गेल्या दहा वर्षांपासून मुस्लिम समुह भयग्रस्त अवस्थेत जगतोय आणि म्हणून महाराष्ट्रातील ११% मुस्लिम भाजपला संपविण्यासाठी एकजुटीने मतदान करण्याच्या मूडमध्ये आहे....!!
७) ओबीसी समुहाचे मंडल आयोगाने दिलेले आरक्षण सुरक्षित नाही आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी भाजप आपल्या सोबतं नाही,भाजपची सत्ता असुनही जातिनिहाय जातगणना केली जात नाही,धर्माच्या नावाखाली आपली मते लाटली जातात मात्र आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नावर भाजप आपल्या पाठिशी खंबीरपणे ऊभा राहतं नाही हा अनुभव घेतल्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आता पुर्वी प्रमाणे ताकदीने भाजपच्या पाठिशी ऊभा नाही हा ओबीसी वर्गाचा मुड आहे...!!
८) तरुणांसाठी नवे रोजगार उपलब्ध केले नाही,तरुण नाराज आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आंदोलन करून दमल्या परंतु त्यांना न्याय मिळाला नाही, आशा स्वयंसेविका यांनाही न्याय मिळाला नाही.विज कामगार संघटना यांनाही न्याय मिळाला नाही, शिक्षक संघटना अस्वस्थ आहेत, एकंदरीत कर्मचारी वर्ग प्रचंड अस्वस्थ आहे, शेतकरीवर्ग शेतमालाला भाव नाही आणि कांदा निर्यात बंदी मुळे प्रचंड नाराज आहे समाजातील एकही घटक सुखी वा समाधानी नाही त्यामुळे भाजपला इंगा दाखविण्याच्या मुड मध्ये सगळेच आहेत, हीच भीती भाजपच्या नेतृत्वाच्या पोटात गोळा आणतेय हे वस्तुस्थिती आहे...!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत