गाडगेबाबा यांच्या 148 व्या जयंती निमित्त अभिवादन
चला शेंडगावाला सखुबाईचा पोरं पाह्याले.
१२८ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्याला ?
काल पसुन माव्ह पोट जरा जरा दुखून राह्यलं व्हतं मी
लाकडाची मोई घेवुन आले घराच्या दारात आपटली
तव्हा मले जमजून राहिलं व्हतं , आज रातच्याले आपले दिस भरले.तव्हा पासनं मले बेज्या कयरेले कय निघत व्हती , पण मिह्याबी तस्याच येधना सहनं केल्या,दोन तीन भाकऱ्या केल्या आबडधोबड भाजी बी केली, कसीबसी आर्धी भाकर चावली, तव्हा मिह्या
म्हणालं आईकताका त्या सुईनीले बलवजा बरं , तव्हा
सुईन आली,मले म्हणे काय गं सकु लय दुखून राहेलं काय गं , डोयाला डोया नाय रातभर घरातली दारात
करत व्हती , झिग्राजी दारात येऊन पाहाते त सुख निघाला व्हता,कोंबड्याने बाग देला गावात बाया दयाला उठल्या घरोघरी जात्याची घरघर सुरू झाली ,
आनं दिसाची तिरीप पडली व्हती , तव्हा सकु बाळातीन झाली ,सुईनीन ईळ्यानं पोराचा नाळ कापला आनं झिग्रा लय तह्यावालं पोरं झकास हाय,
झिग्रा रात पसुन बायको हेपिस झाली , हे दुःख कानान आयकत व्हता म्हणुन ,सकाईच लावुन आला,
सुईनीचा निरोप आला की पयत गेला आनं आधीक
एक पावटी टाकुन आला , जानोरकर सबन आया बाया पोरीसोरी पाह्याले आल्या , तो दिस व्हता आज
२३ फेब्रुवारी १८७६ पाचानं पाच दिसानं पाचवी केली ,नाहानी पुजली ,नाहानीवर चोखटेल तेलाचा दिवा लावला ,जेवारीच्या घुगूऱ्या घातल्या लुगड्या पालवाचा झोका केला ,आनं दुरची मिरा दादीजी म्हणे
मन ग पायना , तव्हा साऱ्याजनी पायना मनु लागल्या.
पाळणा ***
पहिल्या दिवशी बाळ जलमला
आनंद झाला त्या जानोरकराला
सखुबाईच्या पोटी बाळ जलमला
डेबुजी डेबुजी बोलवु त्याला जो बाळा जो जो रे जो
सन १८७६ सालाला
२३ फेब्रुवारी दुरऱ्या महिन्याला
झिग्राजीच्या कुळी बाळ तो आला
सखुबाईला आनंद झाला जो जो रे बाळा जो
आठरा पगड दारीद्रे असुन घरी
झिग्राजीची त्यात अती नादारी
उध्दारकरण्या डेबु उध्दारकरी
जानोरकरांचा डेबु लय भारी जो जो रे बाळा जो
शेंडगावाचा उद्धार झाला
विवेक विचार सांगु लागला
झिग्राजीचा पोरं गुणवान झाला
स्वच्छता गाव करु लागला जो बाळा जो जो रे जो
शासन त्यांचे घेईल आदर्श
जानुन घेईल त्यांचे प्रमार्श
गावोगाव होईल घेईल आदर्श
गाडगेबाबाचे सारे घेतील आदर्श जो जो रे बाळा जो
मोरेदादा चला पाळणा गाऊ
गाडगेबाबाचे आदर्श घेऊ
विचार त्यांचे समोर नेऊ
डेबुबाबाचा पाळणा गाऊ जो जो रे जो बाळा जो
डेबु बालवयात मामाच्या गावी दापोरा गावी राहु लागला , मामाच्या शेतावरी एका सावकाराने ताबा केला होता , तो ताबा डेबुजीने परतुन लावला , त्यांना
पोहणे गुरे चारणे खेळ खेळने ह्या गोष्टी त्यांना खूप आवडीच्या होत्या , आणि त्यांना अन्याय अत्याचार ह्या गोष्टी आवड नव्हत्या म्हणुन त्याने घर सोडले, आणि ते संन्यासी झाले ,आज दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी
१२८ वर्ष होत आहेत या जयंती दिनानिमित्ताने गाडगेबाबा यांना पुष्प हार अर्पण करून अभिवादन करतो, धन्यवाद
लेखक. बबनराव मोरे दलित मित्र हिंगोली. प्रचारक. गौतम घंनसावंत. सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप
७२१८५०६४४६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत