मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

सुसंस्काराचे मोठे विद्यापिठ म्हणजे आपले आई वडील होय : स.पो.नि.स्वप्नील लोखंडे

नंदगाव (शाम नागीले ) ज्या प्रमाणे राजमाता जिजाऊ ने शिवबाला घडविले त्याच प्रमाणे आपल्याला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या सानिध्यात आपण लहानाचे मोठे झालो ज्यांनी आपणास योग्य असे जीवन जगण्याचे धडे दिले तेच आई आणि वडील हे खरे ज्ञानाचे विद्यापिठ आहे.असे प्रतिपादन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी नळदुर्ग ता.तुळजापूर येथील डॉ.आंबेडकर इंटरनँशनल इंग्लिश मेडीयम स्कूल येथे आयोजीत शिव जयंती व दहावीच्या मुलांच्या निरोप संभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले.
या बाबत सविस्तर असे की या कार्यक्रमांच्या सुरुवातीस रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन सपोनि स्वप्नील लोखंडे व कार्यकमांचे अध्यक्ष मुख्याध्यापिका
सौ.कविता पाटील,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे,प्रा.डॉ. दयानंद कांबळे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार धूप दिप प्रज्वलन करून पुजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे स्वप्नील लोखंडे यांचा मारुती खारवे याच्या हस्ते यथोचीत स्वागतपर सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना स्वप्नील लोखंडे म्हणाले की आपला महाराष्ट हा नररत्नाची खान आहे यांच मातीने छंत्रपती शिवाजी महाराज,संत तुकराम महाराज,माहात्मा ज्योतीबा फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साहीत्यरत्न आण्णा भाऊ साठे,
मॉ जिजाऊ,क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, लोकमात अहिल्यादेवी होळकर अशी महान रणरागिणी आणि रत्न दिले आहे आणि आपण पण याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आहे तेंव्हा आपण या सर्व महापुरुषांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनात अनुकरण करून आपल्या आईवडीलांचे आपल्या देशाचे आणि आपल्या शाळेचे नाव रोषण करावे . जीवनात व्यसनाधिन न होतो चांगले शरीर कमवा चांगले शिक्षण घ्यावे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
या प्रसंगी सहशिक्षक जनक गायकवाड, विशाल महाबोले,शिवाजी जाधवर, सुरेश गायकवाड, सुरेश राजमाने, सहशिक्षिका कविता देशमुख,समिना खतीब,शबाना शेख,कलावती पवार, सदाफ शेख,रंजना घोडके, स्वाती मुळे, श्रीमती मोहरीर मँडम सह विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इ.९ वीतील विद्यार्थीनी शिवरणी कोर,साक्षी कांबळे, सलोनी कुलकर्णी यांनी केले तर अभारप्रदर्श रोशीका हजारे यांनी केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!