MPSC विद्यार्थ्यांचे लाडके नितेश कराळे गुरुजी निवडणुकीच्या रिंगणात.

वैदर्भीय बोलीभाषेत ‘बे पोट्टेहो’ म्हणत स्पर्धा परीक्षांचे शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असलेले वर्धा जिल्ह्यातील “खदखद मास्तर” नितेश कराळे हे अनेक दिवसांपासून राजकारणात येण्याच्या तयारीत होते. दरम्यान, कराळे मास्तर यांनी आपल्या अधिकृत X अकाऊण्टवरुन काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
एवढेच नाही तर कोणत्या जागेवरून विधानसभा निवडणूक लढवणार हेही सांगितले. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि त्यामुळेच नितेश कराळे यांच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे. देवळी पुलगाव किंवा वर्धा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तिकिटासाठी काँग्रेस पक्षाशी बोलणी सुरू असून ते निवडणूक लढवणार हे निश्चित असल्याचेही नितिन कराळे गुरुजी यांनी स्पष्ट केले.
कराळे मास्तर यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी घेतलेली मते प्रमुख राजकीय पक्षांच्या नजरेत होती. पण कराळे गुरुजी ती निवडणुकीत हरले. मात्र त्यानंतरच ते राजकारणात सक्रिय होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत