दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

उर्जावान तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज अंगिकारण्यास शिकवणे ही काळाची गरज..

धाराशिव : समता नगर नळदुर्ग रोड तुळजापूर येथील शहर वासियांच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये महिलांचा तसेच तरुण मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. रहिवाशांनी मिळून शिवरायांना वंदन केले त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संत रविदास महाराज व तथागत भगवान गौतम बुद्ध या मानवतेचा संदेश देणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून जिजाऊ वंदना घेऊन शिवजयंतीला सुरुवात करण्यात आली.

मान्यवरांचे स्वागत करून मनोगत व्यक्त करण्यात आले. आयुष्मान जोगदंड सर यांनी आपल्या भाषणामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगितला. छत्रपतींना मुस्लिमांचे दुश्मन असेच दाखविले जाते परंतु अठरापगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य उभा केले, कधीही कसलीही जात-पात मानली नाही, स्त्रियांचा सन्मान केला. कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडले नाहीत आणि त्याचबरोबर सर्वांसाठी हक्काचे असे स्वराज्य उभा केलं असं त्यांनी सांगितलं. विदेशामध्ये शिवरायांचा “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” या नावाने पदवीचा अभ्यासक्रम घेतला जातो मात्र जिथे शिवरायांचा जन्म झाला त्या महाराष्ट्रामध्ये बाल शिवबा म्हणून प्राथमिक वर्गाला छोटेसे पुस्तक शिकवलं जातं. तारुण्यात असलेल्या, सळसळत्या रक्ताच्या उर्जा वान तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पाहिजे. समजूतदारपणा आलेल्या युवकांना छत्रपती शिकवणे जास्त गरजेचे आहे. सर्वांना सामावून घेऊन स्वराज्याची स्थापना कशी केली, कशा पद्धतीने अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य केल्या आपलं सैन्य व मनुष्यबळ थोडसं असताना मोठमोठ्या लढाया कशा जिंकल्या हे खरंतर नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांकडून खूप काही घेण्यासारखा आहे. भाजीच्या देठाला सुद्धा धक्का न लागू देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे राजकर्ते यामध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचं सरांनी सांगून दिलं.

कार्यक्रमाला समता नगर चे नगरसेवक अमर भैया मगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय सचिन भैय्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय ऍडव्होकेट रामचंद्र ढवळे, जवाहर नवोदय विद्यालयाचे उपप्राचार्य सूर्यकांत गायकवाड, खादी ग्रामोद्योग चे चेअरमन विलास गायकवाड सर, भीम नगर तुळजापूर चे नगरसेवक औदुंबर कदम, आण्णा भाऊ साठे नगर चे नगरसेवक किशोर साठे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पर्यटन सचिव दत्ता माने यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. बाबासाहेब वडवे, वामन राव गायकवाड, विलास सरवदे, देविदास धाकतोडे, अभिमान शिंदे, मेतेकर साहेब, नागनाथ शिंदे, पारवे आण्णा, चौधरी साहेब भागवत जेटीथोर सर विनोद बनसोडे, तम्मा गायकवाड महादेव जाधव, धन्यकुमार मोरे,यांच्यासह नगरातील तरुण मुलं मुली व महिलांनी परिश्रम घेतले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!