24 फेब्रुवारी 2024 शनिवार रोजी अंबरनाथ येथे एकदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन

24 फेब्रुवारी 2024 शनिवार रोजी अंबरनाथ येथे एकदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे असून संमेलनाचे उदघाटन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागतध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बी. अनिल तथा अनिल भालेराव हे आहेत.
यावेळी भव्य संविधान रॅली काढून संमेलनाला सुरुवात होणार आहे.या साहित्य संमेलनात संविधान, मराठी साहित्यातील बहुजनांचे योगदान या विषयांवर परिसंवाद होणार असून सपूर्ण राज्यातून कवी,लेखक आणि रसिक सहभागी होणार आहेत, या संमेलनाला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.संमेलन यशस्वी होण्यासाठी शामराव सोमकुवर, धनंजय सुर्वे, सुनील दुपटे, सुधाकर सरवदे परिश्रम घेत आहेत.अधिक माहितीसाठी 9860133950 या क्रमांकावर सपंर्क साधावा.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत