नेपाळच्या काठमांडूत सुरू असलेल्या “World Social Forum ” मध्ये, भारतीय संविधानाचा प्रचार -मा. विशाल हिवाळे
नेपाळच्या काठमांडूत WSF-2024चा दिमाखदार उदघाटन सोहळा संपन्न झाला या जागतिक विचारमंचावर जय,जय,जय,जयभिमचा निनाद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्य जयघोष ऐकुन छाती अभिमानाने फुलली. मेधाताई पाटकरांच्या भाषणातील बुद्ध,आंबेडकर आणि संविधानाच्या वैचारीक पेरणीने तिथलं वातावरण भारतमय झाल्यासारखं वाटलं.आठ पर्वत रांगांच्या हिमालय कुशीत सुरू असलेल्या wsf मध्ये कडाक्याची जीवघेणी थंडी विरून,तेथीलः वातावारण अचानक हाॕट झाल्याचं जाणवलं.
मी जगातील विविध देशांच्या प्रतिनिधींना व भारतातल्या अनेक राज्यातील प्रतिनिधींना भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन तिथे संविधानाचा प्रचार-प्रसार करित होतो.त्यांना संविधानाचं महत्त्व समजावून सांगत होतो.wsF2024 मध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देशच संविधानाचा प्रचार-प्रसार करणं हा आहे.जगभरातील लोक त्यांचे मूलभूत प्रश्न,असंख्य मुद्दे घेऊन रॕलीत सहभागी झाले होते.शिक्षण, बेरोजगारी,पर्यावरण हानी,दलित, आदीवासी,भूमिहीन,महिला, असे शेकडो स्थानिक व जागतिक प्रश्न घेऊन हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झालेत.
पुढील चार दिवस चालणाऱ्या या wsf मध्ये असंख्य सेमिनार आज पासुन सुरू होत आहेत. मी आणि काही सहकारी भारतीय संविधानाचा प्रचार करणार आहोत.उद्देशिका भेट देऊन भारतीय संविधाना बद्दल इतर देशांच्या कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद करणार आहोत.पुढील चार दिवस मी संविधानाचा प्रचार-प्रसारच करणार आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत