जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न .शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे यांची माहिती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी तालुका दौंड येथे शनिवार दिनांक १० फेब्रुवारी२०२४ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली . याविषयी अधिक माहिती देताना खोरवडी शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे म्हणाले की ,शनिवार दि. १०/०२ /२०२४ रोजी जि.प.प्राथ. शाळा खोरवडी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व त्यांच्या जवळ असणाऱ्या ज्ञानास व्यक्त करण्याची संधी मिळावी म्हणून प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषा या उपक्रमातून स्पर्धेचा अनुभव देण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोठ्या उत्साहात हा उपक्रम पार पडला.
यामध्ये सहभागी विद्यार्थी पुढील प्रमाणे
गट क्रमांक १ सावित्रीबाई फुले गट
१)अवधूत कुचेकर. इ.७ वी.
२) स्वरा आवदे इ. ६ वी.
३) करिष्मा शेख इ. ५ वी.
गट क्रमांक २ राणी लक्ष्मीबाई
१) वैष्णवी जाधव इ.७ वी.
२)श्रेयस शिपकुले इ.६ वी.
३)करण जाधव. इ.५ वी.
गट क्रमांक :३ राजमाता जिजाऊ
१)अर्चना बावडेकर इ.७ वी.
२)श्रावणी शिपकुले इ.६ वी.
३)सोहम अडागळे इ.५ वी.
प्रथम क्रमांक गट क्रमांक २ मधील विद्यार्थी
१) वैष्णवी जाधव
२) श्रेयस शिपकुले
३) करण जाधव
यांनी आपल्या बौद्धिक चातुर्याने पटकावला.
प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक मा .गौतम कांबळे सर व सर्व शिक्षक यांच्या हस्ते बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. सौ. नीता भद्रे मॅडम, सौ. साक्षी कोंडजकर मॅडम व अभिजीत कोंडजकर सर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. उपक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल कदम मॅडम यांनी केले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला. दौंड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी मा . संजय महाजन शाळेला वेळोवेळी मार्गदर्शन करतात
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत