मातंग समाजातील प्रांजल पाटोळे ऑलिंपिक मध्ये धनुर्विद्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणार:– प्रबुद्ध साठे

मातंग समाजातील प्रांजल ऑलिंपिक मध्ये भारताला गोल्डमेडल मिळवून देणार:- प्रबुद्ध साठे पंढरपूर:– मुलीच्या जन्माचे सहर्ष स्वागत करा, मुलीचा बाप होणं हा आयुष्याचा सगळ्यात मोठा सन्मान असून आज मुलीं शासन प्रशासनात, व सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत, म्हणूनच मातंग समाजातील इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेली प्रांजल पाटोळे ही नक्कीच भारताला ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक मिळवून देईल, असा ठाम विश्वास व आत्मविश्वास चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी व्यक्त केला, ते मातंग समाजातील इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी कु प्रांजल गुरूप्रसाद पाटोळे हिने धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला व तिची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत निवड झाली त्यानिमित्ता कांबळे परिवाराने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते, प्रबुद्ध साठे यांच्या शुभहस्ते प्रांजल चा सत्कार करण्यात आला, प्रथम कु प्रांजल पाटोळे व प्रबुद्ध साठे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध, यांच्या स्वरपास फुले वाहून व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी V S कांबळे सर, सविता कांबळे मॅडम, स्वागत कांबळे, वैष्णवी कांबळे मॅडम, प्रांजल चे आई वडील गुरूप्रसाद पाटोळे, उज्वलाताई पाटोळे उपस्थित होते, अशा कर्तृत्ववान होतकरू, मुलामुलींच्या पाठीमागे समाजाने उभे राहावे, एवढ्या लहान वयात प्रांजल ने यश मिळवले याबद्दल प्रबुद्ध साठे यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले, तिला पुढील यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देत आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू असे अभिवचन दिले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत