इंग्लंडचा पहिला डाव आज २५३ धावांवर संपला. जसप्रीत बुमराह ने ६ गडी बाद करत कसोटी क्रिकेटमधला दीडशे बळींचा टप्पा ओलांडला. भारत – इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे १७१ धावांची आघाडी आहे. ३४ सामन्यात हा आकडा पार करणाऱ्या बुमराह ने एका डावात ५ पेक्षा जास्त बळी घेण्याची ही दहावी वेळ होती.भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा झाल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात ५ षटकात बिनबाद २८ धावा केल्या होत्या.मालिकेतला पहिला सामना जिंकून इंग्लंडने एक – शून्य अशी आघाडी घेतली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत