१५ दिवसात अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी…

पंधरा दिवसात अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करावं, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारनं, दिलेल्या आश्वासनांची येत्या नऊ फेब्रुवारी पर्यंत पूर्तता केली नाही तर दहा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. रायगडावर शिवरायांच्या समाधीचं आज जरांगे पाटील यांनी दर्शन घेतलं त्या नंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. आंदोलन अद्याप थांबलेलं नसून एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू नये यासाठीच दहा फेब्रुवारीपासून उपोषण करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारनं सर्व गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत