उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन…

लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीनं सरकारनं सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावं आणि फलकबाजी करू नये असं आवाहन संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं. सुरेश, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय आणि सुखेन्दु शेखर रॉय, संयुक्त जनता दलाचे राम नाथ ठाकूर, द्रमुकचे टी. आर. बालू आणि माकपाचे पी. आर. नटराजन यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते हिवाळी अधिवेशनात निलंबित झालेल्या सदस्यांचं निलंबन मागे घेण्याची विनंतीही अध्यक्ष आणि सभापतींना केल्याची माहिती त्यांनी दिली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या संबोधित करतील. त्यानंतर गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी आर्थिक वर्षाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. हे अधिवेशन ९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई आणि देशावरच्या वाढत्या कर्जाचा मुद्दा उपस्थित करू असं काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, पीयूष गोयल आणि अर्जून राम मेघवाल यांच्यासह काँग्रेस नेते के.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत