देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
छत्तीसगडमधे बस्तर विभागात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद तर १४ जखमी…

जखमींना उपचारासाठी हवाई मार्गे रायपूरला हलवण्यात आलं. छत्तीसगडमधे बस्तर विभागात आज माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले, तर १४ जण जखमी झाले. केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष कृती दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा रक्षकांचं एक संयुक्त पथक बस्तर विभागातल्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमा भागात गस्त घालत असताना टेकलगुडेमजवळ माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या पथकातल्या जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत