विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांनी जात प्रमाणपत्र पडताळणी साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त शिंदे व संशोधन अधिकारी सोनवणे यांचा सन्मान
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
धाराशिव जिल्ह्यातील शासकीय व निम शासकीय विद्यालय किंवा महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत आसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक संपूर्ण कागदपत्र घेऊन आपण आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती धाराशिव येथे आपला प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन धाराशिव जिल्ह्याचे जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे व जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती सुलोचनाताई सोनवणे यांनी केली आहे
धाराशिव जिल्ह्यात फक्त विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कागदपत्रासह धाराशिव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जाती प्रमाण तर पडताळणी समितीकडे आपला प्रस्ताव सादर करावेत प्रस्ताव करताना आपल्या वंशावळ मधील सर्व नातेवाईका व त्यांच्या पुराव्यासह प्रस्ताव सादर करावेत .
जेणेकरून हा प्रस्ताव त्रुटीमध्ये राहू नये याची सर्रास काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे . जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील सर्व कर्मचारी यानी तत्पर सेवा देणार असून सर्वांचे प्रस्ताव या ठिकाणी एक महिन्याच्या आत निकाली काढणार असल्याचे मत वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली .विद्यार्थ्यांनी आपल्या प्रस्ताव तात्काळ जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीला दाखल सादर करावेत .
या संदर्भात धाराशिव जिल्हातील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीतील सर्वच सन्माननीय कर्मचारी यामध्ये भुषण माने , सुर्यकांत कठारे , विशाल रणदिवे , महेश कोळी ,राहुल कानवले , श्रद्धा निकंबे , उत्तम जाधव , ढगे यांनी आलेल्या पालकांना खूप चांगल्या पद्धतीने समज देऊन तो प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगतात जेणेकरून कोणत्याही विद्यार्थीचे कसल्याही प्रकारचे हेळसांड होऊ नये यासाठी प्रमाणिक प्रयत्न करत आसतात आणी समज देतात अधिकाऱ्या सह कर्मचारी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसुन येतात यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वांचं कौतुक केले जात आहे याचबरोबर नळदुर्ग येथील पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे आणि समितीच्या संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सुलोचनाताई सोनवणे यांचा पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सोबत चंदन गायकवाड आणि विद्यार्थी उपस्थित होते .
गेल्या वर्षी अनेक विद्यार्थांचे त्यांच्या निकषाप्रमाणे त्रुटी पूर्ण करून तात्काळ जात प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यात आले आहे . कारण विद्यार्थांचे कोणत्याही विद्यार्थांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात या सर्व गोष्ठी मुळे सर्वांचे कौतुक व अभिनंदन होत आहे . तरी धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त विदार्थांनी जाती प्रमाणपत्र पडताळणी साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन उपायुक्त बलभिम शिंदे व संशोधन अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी केले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत