धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर !
फडणविसांनी राजीनामा द्यावा – राजेंद्र पातोडे.
देशातील धार्मिक धूर्विकरणाचा परिणाम राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर झाला आहे.धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या स्थानावर पोहचले असून उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणविसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केली आहे.
देशात धार्मिक मुद्यांवरून हिंसक वळण घेणाऱ्या घटनांमध्ये भाजप सत्तेत आल्यावर मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये जाहीर झालेल्या ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार देशात २०२२ मध्ये सर्वाधिक दंगलीचे गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत.डिसेंबर २०२३ च्या ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार गतवर्षात महाराष्ट्रात ८ हजार २१८ दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यात, राज्यातील ९ हजार ५५८ नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाले.
तर, दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेशचा देखील नंबर लागतो. २०२२ मध्ये महाराष्ट्रात ८ हजार २१८ दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनां मध्ये राज्यातील ९ हजार ५५८ नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाले. तर, दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून, गेल्यावर्षी बिहारमध्ये ४ हजार ७३६ दंगलीचे गुन्हे दाखल झाले. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये ४ हजार ४७८ दंगलीचे गुन्हे दाखल असून उत्तर प्रदेश राज्य देशात तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
सरकारचा अजेंडा विकासाचा नसून दंगलीचा आहे, हेच आकडेवारी सिद्ध करीत असून दंगल आणि धार्मिक ध्रुवीकरण करून लोकसभा निवडणुकी साठी राज्याचे वातावरण पेटवत ठेवण्याचा प्रयत्न राज्यातील जनतेने यशस्वी होवू दिला नाही.देशात राज्याला एका कलंकित बाबी साठी एक नंबर बनविणारे देवेंद्र फडणवीस राज्यातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था बाधित करण्यासाठीं जाणीवपूर्वक पाठबळ देत असल्याचे साडे नऊ हजार दंगलीचा आकडा हाच पुरावा ठरतो.
राजेन्द्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.
0942216101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत