भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

कालकथित – भीमकन्या प्रियंकास महाराष्ट्रातल्या सगळ्या चाहत्या वर्गाकडून भावपूर्ण आदरांजली !

हंसराज कांबळे
8626021520
नागपुर.

आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात कलागुण वैभव संपन्न असे प्रतिभावंत लोक जन्मास आलेले आहेत.तसे ते आपले कलागुणाची छटा उमटवून रसिकांच्या मनावर, काळजावर अधिराज्य करुन प्रसिद्धी आणून नाव लौकिकास कलापटलावर येऊन अल्पावधीच्या काळातच आपला सर्वांचा हात सोडून गेलेले आहेत. अशीच महाराष्ट्रात कलागुण क्षेत्रात नावरूपास आलेली कालकथित भीमकन्या – प्रियंका पाटील, नागपूर ही जन्मजातचे वाढत असलेल्या आजाराने परवा दि.27 जाने 24 रोजी आपणा सर्व चाहत्या वर्गांना सोडून काळाच्या पडद्याआड गेली.

तिचा चाहता वर्ग आणि महाराष्ट्रात प्रसिद्धी आलेली माणसं यात गायिका – कडूताई खरात, वैभव खुणे, राजकारणातील – आद. बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर, चंद्रशेखर आजाद सर , मनोज गरबडे सर, दीपक सर , मंगेश नाईक सर, आकाश जाधव सर, गीता नाईक मॅम , निकिता, सविता, ऋतुजा अहिरे आणि संगीता मावशी अशी जवळपास जवळीक असलेला 100 ते 150 चाहता वर्ग तिच्यावर भरभरून प्रेम करायचा.! प्रियंका हिला तिचा चाहता वर्ग ” भीमकन्या सोबतच नागीण ” ह्या नावाने सर्वस्वी ओळखत होता. हीच तिची पहचान होती

विशेष म्हणजे कालकथित प्रियंका आपल्या निघून गेली ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर तिच्या चाहत्या जवळपास 800 वर्गांनी आपापल्या मोबाईलवर स्टेटस ठेवलेले होते हीच तिची ओळख होती. कालकथीत प्रियंका ही शिक्षण क्षेत्रात पदवीधर होतीच पण उत्तम प्रकारे व्याख्याता सुद्धा होती. आपल्या वाणीतून उत्तम प्रकारे स्टेजवर समाज प्रबोधनात्मक भाषण द्यायची. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात कार्यक्रम पार पडलेत त्या त्या वेळेस तिने स्वतः स्टेजवर समाज जागृतीचे भाषण दिलेले आहे भीमकन्या अर्थात नागीण प्रियंकास महाराष्ट्रातल्या सगळ्या चाहत्या वर्गाकडून भावपूर्ण आदरांजली !

दि.29 जाने 24.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!