रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ व दलित वस्तीतल्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार : – मारुती खारवे
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलीच ओळख आहे या शहरांमध्ये अनेक मूलभूत सुविधा पासुन वंचित आसलेल्या लाभार्थी या ठिकाणी राहतात . या वंचितांना न्याय देण्याचे काम करणार आहोत दलित वस्तीतल्या अनेक प्रश्नावरती विचार करून विनमय करुन संबंधित नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी भेटून चर्चा करून वस्तीतल्या विविध प्रश्नावर जातीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत . ७० ते ८० वर्षा पासून वंचित असलेले लाभार्थी या लाभार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असून त्यामध्ये सर्व्हे नं. २९ मधील रमाई आवास घरकुल योजनेच्या संदर्भात पाठपुरावा करून त्या नागरिकांना लाभार्थ्यांना लाभ मिळवा पाणी प्रश्न , आरोग्याचा प्रश्न , रस्त्याचा प्रश्न , भाग बगीच्याचा प्रश्न असेल असे अनेक दलित वस्तीतील नागरीकाना शासकीय सुविधा पासुन वंचित राहू नये संबंधित अधिकार्याना निवेदन देऊन आपण करून घेणार असल्याचे मत मारुती खारवे यांनी व्यक्त केले . मारुती खारवे हे सामाजिक , राजकीय धार्मिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतात त्यानी आजतागायत नळदुर्ग शहरात डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडीयम स्कुल सामाजिक क्षेत्रात अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत समाजाशी एकरूप होऊन समाजा सोबत खुप चांगल्या पद्धतीने नाळ जुळलेली आहे म्हणून त्यांची आर पी आय ( आठवले )नळदुर्ग शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . मारुती खारवे यांच्यावर जबाबदारी पडताच विविध पत्रकार , पक्ष , संघटना यांच्या यांनी नुकताच मारुती खारवे यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , जेष्ठ पत्रकार विलास येडगे
आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे पत्रकार तानाजी जाधव , संजय जाधव , आर पी आय चे नेते प्रमोद कांबळे
मावळते अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, सम्राट ग्रुपचे सुर्यकांत सुरवसे
शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख ज्ञानेश्वर घोडके , पद्माकर घोडके माजी नगर सेवक सुधिर हजारे सोसायटीचे सदस्य रघुनाथ नागणे
भिम अण्णा सामाजिक संघटनेचे धर्मराज देडे , सचिन कांबळे अरविंद गायकवाड , शाम नागिले
अदिजनांच्या उपस्थितीत हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौध्दाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले सुत्रसंचलन रिपाई चे जिल्हा सचिव एस के गायकवाड यांनी केले तर आभार शाम नागिले यांनी मानले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत