बदलापुरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के चे पक्षाध्यक्ष मा राजाराम खरात यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी बदलापुरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
श्री कॉम्प्लेक्स बेलवली येथून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच घोषणांचा जयघोष करीत सदर रॅली बदलापूर एसटी बस स्थानक जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर सदर रॅली बाजारपेठ मार्गाने घोषणांचा जयघोष करीत रमेश वाडी येथील संविधान स्मारक येथे आल्यानंतर मा सुरेश टावरे माजी खासदार भिवंडी लोकसभा क्षेत्र तसेच मा शैलेश वडनेरे माजी नगरसेवक बदलापूर तसेच मा अकबर, अनिल भालेराव, साहित्यिक, शामराव सोमकुवर, मा प्रदीप रोकडे, मा भारत कारंडे, मा अभिजीत धुरत, तसेच बदलापूर आरपीआय कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाहीर शितल भंडारे व पार्टी प्रबोधन कला मंच तसेच शाहीर अशोक कांबळे यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम झाला. त्यानंतर मा अशोक गजरमल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार सुरेश टावरे यांनी सर्व जनतेला गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व आगामी निवडणुकीत समाविचारी पक्षाच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी देखील सर्व जनतेला गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, सध्या मराठा आरक्षण करता आंदोलन चालू आहे परंतु ते सध्याच्या केंद्र सरकारने सर्व सरकारी कंपन्या भांडवलदारांच्या घशात घातल्या आहेत. त्यामुळे आरक्षण संपुष्टात आलेले आहे व सरकारी नोकऱ्याच शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यानंतर दैनिक सार्वभौम राष्ट्र चे संपादक मा प्रेम रत्न चौकेकर यांचे संविधान प्रबोधनात्मक अभ्यासपूर्ण असे भाषण झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यानंतर भीम स्तुतीचे पठण करण्यात आले. त्यानंतर उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच आभार प्रदर्शन झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले व त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत