अक्षरांचा मायाजाल – सुधीर कांबळे
लेखक –
सुधीर कांबळे
७८७५४९१४५२
साहित्य वाचन्याचा छंद मला जडला तो शालेय जीवनापासूनच. आज त्या साहित्यातील अक्षरांशी मी पुन्हा संवाद साधला.अक्षरांना विचारल —
जंगलाच्या निबीड अंधारात पहिल्यांदा लागलेली आग सर्वप्रथम ‘ काळाने ‘ कधी पाहिली ?
अक्षरे म्हणाली, इसविसनपूर्व सहा हजार वर्षांपूर्वी – जंगलातील एका गुहेत. आजपासून अंदाजे तीनशे एकसष्ठ पिढ्यांपूर्विची ही गोष्ट आहे.
पुन्हा विचारल, अग्निचा शोध मानवजातीला मिळालेलं वरदान होत की शाप ? अक्षरे म्हणाली,- होय, तेंव्हा ते वरदानच होत.पण आज अभिशाप ठरले आहे.कारण तेंव्हा ‘ तुझं आणि माझं ‘ म्हणायचे युगच सुरू नव्हते झाले.अग्नी आणि हत्त्यारे जोपर्यंत जंगली प्राण्यां पासुन रक्षणाची साधने होती, तोपर्यंत ती मानवाला वरदानच ठरली. परंतु जसजशी ती हत्यारे मानवाच्या रक्षणाची साधने बनू लागली, तेंव्हा पासूनच या वरदानच रूपांतर अभिशापात होत गेले. ही साधने माणसावरच उलटली. पशुधनाचे संपतीत जसजसे रूपांतर होत गेले, तसतसे हव्यासापोटी ते लुटण्यात येऊ लागले. आणि तिथुनच स्रीच्या वस्तुकरणाला सुरुवात झाली. स्री संपती म्हणून लुटल्या जाऊ लागली आणि मग तनाच्या गुलामी बरोबर मनाची गुलामी सुरू झाली.
जेंव्हा राजाने ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सोने,पशू आणि दास – दासी दानात दिल्या, तेंव्हा ऋषींनी राजाच्या स्तुतीचे गीत लिहीले आणि गायले… ही एक्के चवेचाळीस पिढ्यान् पुर्वीची गोष्ट आहे – ‘ तेंव्हाच्या राजसत्ता आणि ब्राह्मनसत्ता या दोघांनी मिळून तत्कालिन मानवी वंशालाच नव्हे, तर पुढे जन्म घेणाऱ्या शेकडो पिढ्यांना गुलाम होण्यास मजबूर केले ! ‘
ऋषी – कवींना धन – संपती आणि कांचनमाला सारख्या सुंदर स्रिया म्हणून मिळू लागल्या .मग काय, त्यांच्या देव रुपी मस्तकातून ” अक्षरांचा मायाजाल ” मानवा भोवती गुंफत गेला. परिणामी, माणूस नावाचा प्राणी या मायाजालाला सुरक्षा कवच समजून त्यात गुरफटत गेला. हा अभेद्य मायाजाल आजही कायम आहे. तो भेदण्याचा उपाय काय ?
तेंव्हा अक्षरे म्हणाली – बाबारे, या अक्षरांच एक तर्कशास्त्र असत. ज्याप्रमाणे ‘ लोहेको लोहा काटता है ‘
अगदी तसच या अक्षरांच्या मायाजालाला अक्षरांचे तर्कशास्त्र कापू शकते. हे मायाजालच गुलामी आणि विषमतेला जन्म देत असते. केवळ उजव्या विचार सरणीच्या बळावरच कोणताही देश गुलामीतून स्वतंत्र होत नसतो आणि एक शक्तिशाली राष्ट्र बनू शकत नाही.
कारण ज्या समाजाला तर्कशास्त्र आणि विवकाचे सामर्थ्य लाभते, तोच समाज आपल्या स्वतंत्र चिंतनाच्या बळावर देशाला समृद्धशाली बनवू शकतो. असा समाज घडविण्याचे कार्य अक्षरेच करीत असतात. मग ती अक्षरे देशाच्या संविधानातील असोत अथवा विचारवंत तत्वज्ञानी लेखकांच्या समृद्ध शील साहित्य सर्जनातील असोत !
ज्या लेखणीने अक्षरे लिहिली जातात, ती लेखणी सरकारच्या खुशामतीसाठी घासल्या गेली, तर ती अक्षरे मानवी सभ्यतेला दंश करीत असतात, पोखरत असतात. या अक्षरांमुळेच आमच्या कित्येक पिढ्या बरबाद झाल्या आहेत. संपूर्ण आणि सर्वकष परिवर्तन करण्याची ताकद ज्या अक्षरातील विचारात असते, तेच देशाचे खरे सौंदर्य आणि सामर्थ्य असते.
खूप वर्षापूर्वी मी एक ऐतिहासिक कथा वाचली होती. त्या कथेनुसार – सात राजवैद्यानी समकालिन बौद्धिक तेला बंदिगृहात अपराधी म्हणून कैद केले होते.या बौद्धिकतेला प्रचंड यातना दिल्या आणि अखेर ती वेश्यां बनण्यास तयार झाली. या बौद्धिकता नामक नायिकेची काही विद्वानांनी बंदिगृहातून सुटका केली. प्रजेला आनंद झाला.ते विद्वान कला आणि शक्तीचे प्रतीक बनले. मग राज्यात नवनिर्मितीला छानपैकी सुरुवात झाली.
देशातील विद्वान विचारवंतांनी निडर बनून आपली लेखणी झिजवली, तर भ्रमित आणि भयग्रस्त समाजाची निर्मिती करण्याचा सांस्कृतिक मनोदय पुर्ण होणे अशक्य होईल. एकदा का अशांना रान मोकळे झाले, की देशातील प्रत्येक माणसा भोवती ” अक्षरांचा मायाजाल ” पुनश्च गुंफण्यास बेधडक सुरुवात होईल आणि मग तनाच्या गुलामी बरोबर मनाची गुलामी सुरू होऊन आपल्या शेकडो पिढ्या गारद कशा झाल्या, हे देशातील कोणत्याही समूहाला,समुदायाला कधीच उमजणार नाही !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत