मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे…
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचे त्यांनी आज वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदेलनस्थळी सांगितले. आरक्षणाबाबतचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींना दिले जाणारे अधिकार आणि सवलती दिल्या जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी विजयोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना नव्या शासन निर्णयाची प्रत दिली आणि मुख्यामंत्र्यांच्या हातून फळांचा रस घेऊन जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. तत्पूर्वी, मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा असल्याचं जरांगे पाटील यांनी दिला
महाराष्ट्रात मराठा समाजात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हा जीआर काढल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले आणि हा आदेश कायमस्वरूपी रहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत