महाराष्ट्राला ६ पद्मभूषण आणि ६ पद्मश्री पुरस्कार जाहीर…
पुरस्कारांमध्ये परदेशी भारतीय श्रेणीत आठ आणि नऊ मरणोत्तर पुरस्कार तसेच तीस महिला पुरस्कारार्थींचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, केंद्रानं देशातल्या सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता चिरंजीवी, माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, ज्येष्ठ नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील उदय देशपांडे यांना क्रीडा क्षेत्रसाठी, वैद्यकीय क्षेत्रासाठी मनोहर डोळे, साहित्य-शिक्षण क्षेत्रात झहीर काझी, वैद्यकीय क्षेत्रात चंद्रशेखर मेश्राम, उद्योग व्यापारात कल्पना मोरपारिया तर सामाजिक कार्यासाठी शंकरबाबा पापळकर यांना गौरवण्यात येणार आहे. १७ पद्मभुषण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते राम नाईक, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, साहित्य शिक्षण पत्रकारिता क्षेत्रात कुंदन व्यास, होरमुसजी कामा, वैद्यकीय क्षेत्रासाठी अश्विन मेहता यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रात या व्यक्तींनी दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्कारानं सन्मानित सर्वांचं अभिनंदन केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत