
राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान,‘भारतरत्न’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. ठाकूर यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली आहे. ठाकूर एक प्रमुख समाजवादी नेते होते. त्यांना जननायक म्हणूनही ओळखलं जात असे.मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी भरीव कार्य केलं होतं.सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ,महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षात ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्याच्या निर्णयावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा पुरस्कार केवळ कर्पूरी ठाकूर यांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान नाही,तर समाजात न्याय्य व्यवस्था निर्माण करण्याचं त्यांचं ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशा शब्दांत प्रधानमंत्रीांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कर्पुरी ठाकूर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय जडणघडणीवर अमिट छाप सोडली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत