तथागत बुद्धांनी काय नाकारले आहे ?
सध्दम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम. सुधाकर ग्यानुजी पखाले.
तथागत बुद्धांचा धम्म सत्यावर, विज्ञानावर आधारलेला आहे, बुद्धांचा धम्म मानवाच्या कल्याणाचा, हीताचा व सुखाचा आहे, बुद्ध धम्म मनुष्य सुखी कसा होईल याचा विचार सांगून मंगलमय व आनंदाचा, सुखाचा मार्ग दाखवतो. बुद्ध नेहमी बुद्धीवादाकडे घेऊन जाणारा विचार सांगतात त्यावेळी त्यांनी काही गोष्टी नाकारल्या आहेत.१) तथागत बुद्धांनी वेदांना प्रमाण मानणे नाकारले आहे. २) तथागत बुद्धांनी आत्मा व मोक्ष मानणे नाकारले आहे. ३) तथागत बुद्धांनी आत्म्याचा पुनर्जन्म होतोय हे नाकारले आहे.४) तथागत बुद्धांनी देवाच्या नावाने कर्मकांड, यज्ञ, होमहवन करणे नाकारले आहे. ५) तथागत बुद्धांनी आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात संसरण करतो हे नाकारले आहे. ६) तथागत बुद्धांनी या जन्मातील मनुष्याला भोगावे लागणारे सुख-दुःखे ही पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहे असे मानणे नाकारले आहे. ७) तथागत बुद्धांनी मी कोण ? मी कुठून आलो ? मी कसा आलो ? यासारख्या फोल निरर्थक कल्पना नाकारलेल्या आहेत. ८) तथागत बुद्धांनी आत्मा म्हणजे देह, आत्मा म्हणजे संवेदना, आत्मा म्हणजे चेतना या सर्व गोष्टी नाकारल्या आहेत.९) तथागत बुद्धांनी उच्छेदवाद व नास्तिकवाद नाकारला आहे.१०) तथागत बुद्धांनी देव व दैववाद नाकारला आहे.११) तथागत बुद्धांनी स्वर्ग ही कल्पना नाकारली आहे.१२) तथागत बुद्धांनी या जगाचा कर्ता-हर्ता कोणीतरी देव आहे हे नाकारले आहे.१३) तथागत बुद्धांनी ईश्वराने मनुष्य निर्माण केला किंवा ब्रह्माच्या देहातून मनुष्य निर्माण झाला हा सिद्धांत नाकारला आहे.१४) तथागत बुद्धांनी उच्च-नीच जात-पात नाकारली आहे. १५) तथागत बुद्धांनी प्राणी बळी देणे, हिंसा करणे नाकारले आहे. १६) तथागत बुद्धांनी काल्पनिक अनुमान नाकारला आहे.१७) तथागत बुद्धांनी नशीब नाकारले आहे.१८) तथागत बुद्धांनी जीवनाचा देववादी सिद्धांत नाकारला आहे.१९) तथागत बुद्धांनी जगाचे भवितव्य हे ईश्वराने पूर्ण निर्धारित केले आहे हे नाकारले आहे.२०) तथागत बुद्धांनी पूर्वजन्मीच्या कर्माचा परिणाम म्हणून या जन्मी दुःख आहे हे नाकारले आहे.अकुशल कर्म तथागत बुद्धांनी अकुशल कर्म सांगितली आहेत. १) हिंसा करणे. २) चोरी करणे. ३) व्यभिचार करणे. ४) असत्य भाषण करणे. ५) मद – मादक पदार्थाचे सेवन करणे. ६) दुसऱ्यांची निंदा करणे. ७) व्यर्थ बडबड करणे. ८) कठोर बोलणे. ९) लोभ करणे. १०) द्वेष करणे. ११) मोह करणे. अशाप्रकारे माणसाकडून पापकर्म घडते याला मनुष्यच रोखू शकतो. *????नमो बुद्धाय ????* ???? भवतु ???? सब्ब ???? मंगलम ????================================== #धम्मप्रचारक विनय ढोके ( #बौध्द ) #सहसचिव #महाबोधि #उपासक #संघ नागपुर महाराष्ट्र! समाज माध्यमातून साभार…..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत