संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस पाच दिवसीय भारत दौऱ्यावर…
आज सकाळी त्यांचं दिल्लीत आगमन झालं. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस पाच दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि संयुक्त राष्ट्रांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी, भारताचे प्राधान्यक्रम तसंच जागतिक आव्हानांविषयी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.या दौऱ्यादरम्यान फ्रान्सिस परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांच्याशी विविध द्विपक्षी मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.ते महात्मा गांधींची समाधी राजघाटावर श्रद्धांजली वाहतील. ते जयपूर आणि मुंबईतही येणार आहेत.मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पित करतील. २६ जानेवारीला ते राज्याच्या प्रजासत्ताक दिन संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधांविषयीच्या चर्चेत सहभागी होतील.बुधवारी भारतीय जागतिक परिषदेत फ्रान्सिस यांचं व्याख्यान होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत