शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला नोटीस…
विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. त्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावून २ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश शिंदे गटाला दिले. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी का घेऊ नये अशी विचारणाही न्यायालयानं उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांना केली. उच्च न्यायालयात ही सुनावणी घेतली तर निकालाला विलंब होईल, असं सिब्बल म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत