भारताचा चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीचा मुकाबला दक्षिण कोरियाच्या के कांग मिन ह्युक आणि सियो सियुंग यांच्याशी होणार आहे. राजधानी नवी दिल्लीत सुरू इंडियन ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत आज दुपारी पुरुष दुहेरीचा अंतीम सामना होणार आहे. दरम्यान, काल झालेल्या उपांत्य फेरीत सात्विक आणि चिराग जोडीनं मलेशियाच्या डब्ल्यू वाय सोह आणि ए चिया या जोडीचा २१-१८, २१-१४ असा पराभव करत अंतीम फेरी गाठली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत