महाराष्ट्रमुख्यपान

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळा स्वतंत्र ओबीसीचा प्रवर्ग निर्माण करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले…

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्गीय यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळेल, असा पर्याय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुचवला आहे. ओबीसींच्या सध्याच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळा स्वतंत्र ओबीसीचा प्रवर्ग निर्माण करावा. यावर सरकारने त्वरित निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. क्रिमीलेयरच्या मर्यादेमुळं ज्यांचेवार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा ओबीसींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो. त्याप्रमाणे ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे आठवले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!