शालेय आणि उच्च शिक्षणासाठीच्या सर्व अभ्यासक्रमाचं अभ्यास साहित्य भारतीय भाषांमध्ये DIGITAL स्वरूपात उपलब्ध…
शिक्षण मंत्रालयानं काल जारी केलेल्या आदेशात, सरकारने सर्व विद्यापीठ अनुदान आयोग, एनसीआरटी आदी नियामक संस्थांसह आयआयटीसाऱख्या संस्थांना पुढील तीन वर्षांत सर्व अभ्यासक्रमांचं अभ्यास साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शालेय आणि उच्च शिक्षणासाठीच्या सर्व अभ्यासक्रमाचं अभ्यास साहित्य संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भारतीय भाषांमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आलेल्या शिफारशीनुसार, प्रत्येक स्तरावर शिक्षणात बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि चांगले यश मिळवता येईल, असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, एआयसीटीई आणि शालेय शिक्षण विभागाला राज्यांतील शाळा आणि विद्यापीठांच्या संदर्भात यावर काम करण्याचीही सूचना देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत