दिनविशेष 3 मे 2024

आज दि. ३ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३३, सुक्कवारो, चेत मासो, शुक्रवार, चैत्र माहे.
३ मे १९२० – रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य लोकांची वेठबिगारी बंद करण्याची राजाज्ञा दिली.
३ मे १९२७ – रोजी बदलापूर जिल्हा ठाणे येथील त्रिशत सांवत्सरिक श्री शिवाजी उत्सव मध्ये विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “राज्याचा अभिमान नसेल तर राज्य टिकत नाही.”
३ मे १९२८ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विधिमंडळात ‘मुंबई नगरपालिका कायदा’ बीलावर भाषण केले.
३ मे १९३६ – रोजी टाऊन हॉलमध्ये नागपूर म्युनिसिपालटी तर्फे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र अर्पण. मांनपत्रास उत्तर देतांना त्यांनी सांगितले की, “राजकीय सत्तेचा वापर न्याय व उदार बुद्धीने करावा लागेल.”
३ मे १९३६ – रोजी नागपूर कस्तुरचंद पार्क येथे अस्पृश्य बांधवांच्या जाहीर सभेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शेकडो वर्षे थांबूनसुद्धा जे कार्य झाले नसते तर या दहा (१०) वर्षांच्या अल्पावधित झाले आहे.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत