
माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडिओ आहेत. ते जर मी पोस्ट केले तर भाजपचे दुकान बंद होईल. तशी कृती मी करणार नाही, कारण आमच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. फक्त बावनकुळेंनी तो मी नव्हेच हे सांगावे, असे आव्हानच राऊत यांनी दिले होते.
फोटोमध्ये मकाऊच्या कॅसिनोमधील कार्पेट दिसत आहे; परंतु खुद्द राऊत यांनी पुन्हा एकदा ‘पिक्चर अभी बाकी है’ असे म्हटल्याने हासुद्धा ट्रेलर असल्याचा अंदाज काही जणांनी व्यक्त केला आहे. यात त्यांनी संजय राऊत यांनी थेट व्हिडिओ शेअर केला आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कॅसिनो खेळत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर खुद्द बावनकुळेंनी आरोप फेटाळून लावत त्याबाबत स्पष्टीकरण दिले; परंतु त्यानंतरही राऊतांनी पिच्छा पुरवल्याचे दिसत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत