
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मला असे समजले की, जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व मंत्र्यांना तंबी दिल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कोणाचा एकेरी उल्लेख करू नये. त्यामूळे मी शांत बसलो होतो, पण मी शांत होतो. तेव्हा येवल्यातील बोर्ड त्यांनी फाडले. मग मी कसा काय शांत बसू? आंदोलक मनोज जरांग पाटील छगन भुजबळ यांच्यावर बोलताना मह्णाले, अजित पवारांनी छगन भुजबळांना कसली तंबी दिली की, शांत बसण्यासाठी की पोस्टर फाडण्यासाठी, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी अहमदनगरच्या सभेतून केला आहे. मी आज अजित पवार यांनाही सांगतो की, जर ते छगन भुजबळ शांत बसले नाही तर मी शांत बसणार नाही. ‘छगन भुजबळांचा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, ‘टोळी मुकादमाला आता तर घरी बसवल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. त्यांचे वय झाले पण खूप गडबड सुरू आहे. कायदा पाळणे जसे आमचे काम आहे तसेच त्यांचेही काम आहे. यामुळे कार्यकर्त्यांना सांगून आमचे बोर्ड फाडणे बंद करायला सांगा’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत