बडोद्यामध्ये बोट बुडून झालेल्या अपघातात १२ विद्यार्थ्यांचा मृत्यू…

खाजगी शाळेतले हे विद्यार्थी शाळेच्या सहलीसाठी तिथे आले होते. बडोदाच्या हरणी तलावात काल एक बोट बुडून झालेल्या अपघातात १२ शाळकरी विद्यार्थी आणि दोन शिक्षक बुडून मरण पावले आहेत. बुडालेल्या बोटीवर चार शिक्षकांसह एकूण २७ प्रवासी होते. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना मध्यरात्रीपर्यंत १० जणांना वाचवण्यात यश मिळालं.या अपघाताची न्यायिक चौकशी करून त्याचा अहवाल १० दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर केल आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल काल संध्याकाळी मदतकार्यावर देखरेख करण्यासाठी घटनास्थळी पोचले होते. मुख्यमंत्री पटेल यांनीही शोक व्यक्त करत मृतांच्या नातलगांना ४ लाख रुपयांचं तर जखमींना ५० हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत