अकोल्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात देशातला पहिला आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू…
पहिल्या ३० विद्यार्थ्यांच्या तुकडीने नुकतेच हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अकोल्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात देशातला पहिला आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.विलास भाले आणि विद्यमान कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बदलत्या परिस्थितीनुरूप सेंद्रिय घटकांच्या प्रभावी वापरासह विषमुक्त अन्नधान्य निर्मिती ही काळाची गरज बनली आहे. त्यानुसार भविष्यात कृषी क्षेत्राशी निगडित सर्व शास्त्रज्ञ, शासन आणि संस्थांना काम करावं लागणार आहे असं डॉ. भाले यावेळी म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत