क्रिकेटदेश-विदेशभारतमुख्यपानसंपादकीय

२० षटकांच्या तिसऱ्या क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय…

भारताने हा सामना खेचून आणला असला तरी अफगाणिस्तानने देखील जिगरबाज खेळ केला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. याचा प्रत्यय बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या क्रिकेट सामन्यातून आला.शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला वीस षटकांचा तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना दोनवेळा झालेल्या सुपर ओव्हरमध्ये भारताने जिंकत मालिकादेखील ३-० अशी जिंकली.त्यानंतर मात्र रोहित शर्माच्या नाबाद १२१ आणि रिंकू सिंगच्या ६९ धावांच्या जोरावर १९०धावांची भागीदारी होत भारताने २१२ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानने देखील गुलबदीन नईब, रहमान उल्लाह गुरबाझ आणि इब्राहिम झादरान यांच्या अर्धशतकीच्या खेळीवर भारताच्या धावांशी बरोबरी केली आणि हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीला भारताची पाचव्या षटकात ४ बाद २२ अशी अवस्था झाली होती. यामध्ये अफगाणिस्तानने १६ धावा केल्या आणि भारत देखील तेवढ्याच धावा करू शकला. त्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवावा लागला.यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११ धावा केल्या.रोहित शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.तर शिवम दुबे हा मालिकावीर ठरला. अफगाणिस्तान सहज हे आव्हान पार करेल असे वाटत असताना त्यांचे दोन फलंदाज संघाची केवळ एक धाव असताना रवी बिश्नोईच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून बाद झाले आणि भारताने हा सामना जिंकून मायदेशात सलग १५ मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!