विषमुक्त शेती ही काळाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत…

शेतीतील विज्ञान पुन्हा नव्याने मांडण्याची आवश्यकता आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सातारा इथे व्यक्त केले. रसायनांच्या वापरामुळे काही काळ शेतीची उत्पादकता वाढली असली तरी आज पुन्हा विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती उत्पादनं ही काळाची गरज बनली आहे. रसायनांच्या वापरामुळे काही काळ शेतीची उत्पादकता वाढली असली तरी आज पुन्हा विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती उत्पादने ही काळाची गरज बनली आहे. सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सव २०२४चं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.सातारा जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देणार असून या भागातील दुष्काळ नावालाही शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.पुणे जल्ह्यातील निरा देवघर उजव्या मुख्य कालव्याच्या बंदिस्त नलिका कालव्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल फलटण तालुक्यातील काळज इथं भूमिपूजन झालं.हा कालवा आणि निरा देवघर प्रकल्पामधून धोम बलकवडी प्रकल्पामध्ये पाणी टाकण्याच्या हा प्रकल्प आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत