
गेल्या सोमवारी मध्यरात्रीनंतर या प्रांतात ६ पूर्णांक २ रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला होता. भ्काम्पाचे झटके बसत असल्याचं जाणवल्यावर लोक आपापल्या घरांमधून तातडीनं बाहेर आले. यामध्ये हजारो घरं आणि शेकडो इमारतीचं नुकसान झालं आहे. चीनमधील गान्सू आणि किंघाई प्रांतात झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता १२७ झाली आहे. प्रचंड थंडीमुळे बचावकार्यातही अडथळे येत असून इमारतींच्या मालाब्यातून मृतदेह शोधणं हे आव्हानात्मक झाल्याचं चीनी वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. २०१० मध्ये झालेल्या ६ पूर्णांक ९ रीख्तर क्षमतेच्या भूकंपानंतर चीनमध्ये झालेला हा दुसरा विनाशकारी भूकंप आहे. त्यवेळी या भूकंपात अडीच हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत