भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

शौर्यांच्या जयस्तंभालाच भिती…

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा ९१३०९७९३००

जयस्तंभ न्यायालयीन लढा लढणारे दादाभाऊ अभंग यांचा संपर्क क्रमांक: 9702845000

कोरेगाव भिमा येथील शौर्य चे प्रतिक असलेला जयस्तंभालाच भिती निर्माण झाली आहे. हि सत्य घटना अनेक लोकांना माहीतीच नाही. १८१८ साली अन्याय, अत्याचार करून विषमतावादी पेशवाई पाचशे शुरविरांनी संपवून टाकली. हा जागतिक पराक्रम कोरेगाव भिमाच्या जयस्तंभामुळे आजही आपल्या समोर आहे. पाचशे शुर योद्ध्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव करून अन्याय अत्याचाराचा बदला घेऊन त्यांचे वर्चस्वच संपवून टाकले. कोरेगाव भिमाची लढाई ही केवळ सत्तेची लढाई नव्हती तर अस्तित्व आणि अस्मितेची होती. ज्या लढाईने शुरविरांचे अस्तित्व दाखवून दिले त्याच अस्तीत्वाची निशाणी अर्थात कोरेगाव भिमाचा जयस्तंभ आज अडचणी मध्ये आहे. दर वर्षी एक जानेवारी ला लाखोंच्या संख्येने कोरेगाव भिमाला जाणाऱ्या लोकांना आजही जर कोरेगाव भिमाच्या जयस्तंभाबद्दल, तेथील अडचणी बद्दल माहिती नसेल तर हि खुप मोठी शोकांतिका आहे. आपण एक जानेवारी कोरेगाव भिमा, विजयादशमी नागपूर, चौदा जानेवारी औरंगाबाद, सहा डिसेंबर मुबंई ला लाखोंच्या संख्येने जमतो आणि दुसऱ्या दिवशी शांत होतो. भिमजयंती प्रत्येक गावात प्रत्येक बौद्ध घरात साजरी केली जाते, हजारो लाखो रुपये खर्च केले जातात, नाचगाणे, मनोरंजन करून दिवस जगुन स्वतः ला आंबेडकरवादी स्वतः च म्हणवून घेण्यात धन्यता मानतो. परंतु एकत्र यायचे कशासाठी? ह्या प्रश्नाचे उत्तर कोणीच शोधले नाही. केवळ इतर लोक जत्रा यात्रा यामध्ये एकत्र जमतात तसेच आपण वरील ठिकाणी जमुन जत्रा यात्रा साजरी करत असु तर आपण अधोगतीकडे वाटचाल करत आहोत हे लक्षात घ्या. आंबेडकरवादी चळवळ करताना आणि विचार सांगताना जत्रा यात्रा भरवून भागणार नाही तर लाखोंच्या संख्येने स्वंयस्फुर्ती ने एकत्र आलेल्या लोकांचे सामाजिक प्रबोधन होणे गरजचे आहे, सामाजिक व वैचारिक कार्याची समिक्षा करून येणाऱ्या काळात कोणकोणत्या गोष्टींवर काम करायचे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. एक जानेवारी आली म्हणून चाललो कोरेगाव ला, चौदा जानेवारी आली म्हणून चाललो औरंगाबाद ला, विजया दशमी आहे म्हणून चाललो नागपूरला, सहा डिसेंबर आहे म्हणून चाललो मुंबई ला केवळ आल्या केल्याने परिवर्तन होणार नाही तर जायचे कशाला हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तरच वरिल ठिकाणी जाण्यात आनंद आहे. आपण आजही आपल्या ऐतिहासिक स्थळाबद्दल जागृत व गंभीर नाही आहोत. याचे उदाहरण म्हणजे नागपूर ला दरवर्षी जाऊनही घरातील अंधविश्वास कमी होत नाही, औरंगाबाद ला दरवर्षी जाऊन ही नामांतर लढ्यातुन एकीची शिकवण घेत नाहीत, भिमाकोरेगाव ला जाऊन ही शौर्य व अन्यायाची जाणीव होत नाही, दरवर्षी घराघरात भिमजंयती साजरी होऊनही भिमाचे विचार डोक्यात जात नाही हे कटूसत्य कोणीही नाकारू शकत नाही. भिमाकोरेगाव जयस्तंभ आणि जयस्तंभाच्या देखभालीसाठी जी जागा दिली होती त्या जागेवर अतिक्रमण केले गेले आहे. जयस्तंभची जागाच आज धोक्यात आली आहे. जर जयस्तंभ सुरक्षित नसेल आणि त्याची माहिती आपल्याला नसेल तर आपण कोरेगाव ला जाऊन साध्य तरी काय करतो. एक जानेवारी ला कोरेगाव जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते याबाबत किती लोक जागृत आहेत. भिमा कोरेगाव जयस्तंभाला अतिक्रमाणाच्या विखळ्यातुन काढण्यासाठी न्यायालयीन लढा लढणे आवश्यक आहे. मागील अनेक वर्षांपासून भिमाकोरेगाव जयस्तंभाची न्यायालयीन लढाई दादाभाऊ अभंग हे एकटेच लढत आहेत. न्यायालयीन बाजु लढायची तर पैसा वेळ खर्च करावा लागतो. एवढे करूनही निकाल काय लागेल याची शाश्वती नसते. भिमा कोरेगाव जयस्तंभ हा समाज्याच्या अस्मितेचे आणि अस्तित्वाचे प्रतिक आहे, दरवर्षी लाखों लोक जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जातात. परंतु याच स्तंभाच्या संवर्धनासाठी कीती लोक समोर येतात हा प्रश्नच आहे. सामाजिक लढा एकट्याने लढायला खुप अडचणी येतात. सामाजिक लढा लढायला समाजाची मदत झाली तर लढायला ताकद आणि सकारात्मक उर्जा मिळते. परंतु कित्येक वर्षांपासून दादाभाऊ अभंग हे एकहाती एकटेच हि बाजु सांभाळून न्यायालयीन लढा तिव्र करत आहेत. अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या मदतीसाठी त्यांनी आव्हाहन ही केले आहे. परंतु आपल्याला त्या बाबींचे गांभीर्य नसल्याने जास्त कोणी मनावर घेत नाही. परंतु आता वेळ आली आहे कोरेगाव भिमाच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन सामाजिक लढा उभा करण्याची. दादाभाऊ अभंग यांना सर्वोतोपरी मदत करून हा न्यायालयीन लढा जिंकण्याची. एकटे दादाभाऊ अभंग हे हा लढा मोठ्या नेटाने लढत आहेत परंतु आपल्याला त्यांच्या सोबत उभे राहून सामाजिक, आर्थिक ताकद लावणे गरजेचे आहे. कारण कोरेगाव भिमाचा जयस्तंभा विषयी खुप मोठे काम करणे खुपच गरजेचे आहे. न्यायालयाचा निकाल आला तर त्याचे संवर्धन व सुशोभीकरण करावे लागेल, निकाल नाही आला तर पुन्हा आव्हान करून वरच्या न्यायालयात जावे लागेल. कोर्ट कचेरीचा खर्च, कोरेगाव भिमा विषयी जनजागृती करून जन समर्थन मिळवण्यासाठी लागणारा खर्च खुप आहे. कोणताही एकटा व्यक्ती हा खर्च करु शकत नाही. आणि एकट्या व्यक्तीनेच हे सर्व का करावे? म्हणून गावागावात प्रबोधन होऊन पैसा वेळ व बुद्धी देऊन आपल्या जयस्तंभाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक टीम बनवून कोरेगाव भिमाच्या स्तंभाच्या समस्येचे गांभीर्य लोकांना माहिती करून देऊन सर्वांनी हातात हात घेऊन काम करणे आज गरजेचे आहे. फक्त गप्पा मारून आणि सोशलमिडीयावर राहून आपल्याला लढा जिंकता येणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल. रस्त्यावर उतरायचे तर पैसा वेळ आणि बुद्धी सर्व काही मजबूत पाहिजे म्हणून सर्वांना नाचगाणे आणि मनोरंजन यावरचा खर्च टाळून कोरेगाव भिमाच्या जयस्तंभासाठी देणे आवश्यक आहे. जयस्तंभच नाही तर लेण्याचे दैविकरण करणे सुरू आहे. अनेक जुन्या मंदिरात बुद्ध मुर्त्या आढळून आल्या आहेत या ही वास्तू आपल्याला जर आपल्या ताब्यात घ्यायचे असेल तर आपल्याला सर्व शक्तीने उभे राहणे आवश्यक आहे. कोरेगाव भिमाच्या जयस्तंभाला वंदन करण्यासाठी दरवर्षी लाखों लोक जातात, लेण्यावर दररोज हजारो लोक जातात तरीही जयस्तंभ आणि लेण्यावर काही लोक अतिक्रमण करू पाहत आहेत याचे कारण आहे लेण्या, जयस्तंभ यांच्या विरोधात जो जाईल, लेण्याचे दैविकरण जो करेल त्याच्या मागे एक आर्थिक शक्ती, एक मानवी ताकद उभी असते. आमच्या च पुर्वजांच्या शौर्याचा जयस्तंभ, आमच्या च बुद्धाच्या लेण्या यावर अतिक्रमण केले जाते तरीही आम्हाला त्याचे काहीच वाटत नाही कारण एक आम्ही कधी आमचे ऐतिहासिक स्थळांचे महत्व कधी समजून घेतले नाही, त्याबद्दल गंभीर कधी झालो नाही. आपली बाजु सत्य असुनही कोणी बोलायची हिंमत करत करू शकत नाही कारण त्याच्या मागे आवश्यक असणारी आर्थिक व सामाजिक शक्ती नसते. म्हणून आम्ही जेथेही लाखोंच्या संख्येने जातो ते फक्त एक दिवस डोक्यात त्या जागे बद्दल, स्थळाबद्दल उर्जा असते. बाकी तेथून घरी आलो की सर्व काही विसरून जातो. फक्त गर्दी करून आणि जत्रा यात्रेचे स्वरूप बनवून प्रश्न सुटणार नाही, न्याय मिळणार नाही. अनेक जन बुद्ध मुर्तीलाच देव म्हणून पुजले जाते याचे व्हिडीओ सोशलमिडीयावर शेअर करतात. पण ते बुद्ध मुर्ती आपल्या ताब्यात घेण्यासाठी काय करावे यासाठी किती लोक प्रयत्न करतात? लेण्यांवर दैविकरण केले जात आहे हे थांबण्यासाठी कोणाकडे काय नियोजन आहे? असे अनेक प्रश्न आहेत यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन एकमताने, पैसा, वेळ व बुद्धी खर्च केली तरच आपण आपले ऐतिहासिक वारसा स्थळे सुरक्षित ठेऊ शकु. नाहीतर भविष्यात आपले वारसा स्थळे भावी पिढी पाहू शकणार नाही. कोरेगाव भिमा च्या जयस्तंभासाठी आपण सर्वांनी दादाभाऊ अभंग यांच्या लढ्याला साथ सहयोग करून त्यांना लढा लढण्यासाठी बळ दिले आणि कोरेगाव भिमाच्या प्रश्नाविषयी जनजागृती केली तर कोरेगाव भिमा च्या लढ्यासह आपण इतरही लढे यशस्वी लढू शकू याची प्रेरणाही मिळेल. बौद्धांचे ऐतिहासिक वारसा स्थळे संकटात असताना आम्ही केवळ एकच दिवस गोंधळ घालून, नाचगाणे आणि मनोरंजन यावर खर्च करून काहीच साध्य होणार नाही. नाचगाणे व मनोरंजन बंद करून, समाजाचे प्रबोधन करून न्याय हक्क व वारसा स्थळांचे जतन व संवर्धन करण्याची उर्जा प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने होईल त्या प्रमाणात मदत करून कोरेगाव भिमाचा जयस्तंभ न्याय व संवर्धनासाठी प्रयत्न करावे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!